Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रस्त्यावर मोठे खड्डे, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात? 

कंपनीने रस्ता तातडीने दुरुस्त करावा, अशी महिला काँग्रेसची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रणयकुमार बंडी

घुग्घुस : एसीसी (अदानी) चांदा सिमेंट कंपनी संचलित माउंट कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलकडे जाणारे रस्ते खड्डेमय झाले आहेत. रस्त्यावर दीड फूट पाणी आहे. विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करणाऱ्या स्कूल बस, ऑटो आणि दुचाकी वाहनांमुळे अपघात होऊन विद्यार्थ्यांचा जीव गमवावा लागतो. सदर रस्त्याची दुर्दशा पाहून महिला काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा यास्मिन सय्यद यांनी शिष्टमंडळासह एसीसी कंपनीची भेट घेऊन तातडीने रस्ता तयार करण्याची मागणी केली.

  महिला काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना बसवून त्यांच्या मागण्या ऐकून घेण्याचे सौजन्य कंपनी व्यवस्थापनाला दाखवता आले नाही. सीएसआर निधीतून परिसरातील गावाचा विकास करण्याचा दावा करणाऱ्या या कंपनीकडून स्वायत्त शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याचे बांधकाम किंवा दुरुस्ती केली जात नाही, ही खेदाची बाब आहे. सदर रस्त्यावर अपघात होऊन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्यास कंपनी व्यवस्थापकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कंपनीच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यास्मिन सय्यद यांनी दिला आहे.

  या शिष्टमंडळात वर्षा पाटील, चंदा दुर्गे, अश्विनी धुर्वे, मीना श्रीवास्तव, आयेशा शेख, मीरा, वासेकर, जुनघरे यांच्यासह महिला पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये