Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात शिक्षण सप्ताह वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा

भोजनदानाने उपक्रमाची सांगता ; विद्यार्थ्यांचा उत्सफूर्तपणे सहभाग

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.प्रा.शेखर प्यारमवार

      भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीद्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे दिनांक 22 जुलै ते 28 जुलै 2024 या कालावधीत वेगवेगळे उपक्रम राबवून शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

शिक्षण सप्ताहाचा पहिला दिवस हा शैक्षणिक साहित्य निर्मिती दिवस म्हणून साजरा करताना विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या टाकाऊ साहित्य वापरून टिकाऊ शैक्षणिक साहित्य निर्माण केले. दुसऱ्या दिवशी पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञानामध्ये विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आले त्यात गणित शिक्षक रवींद्र मुप्पावार व सहाय्यक शिक्षक राहुल आदे यांनी गणिताचे वेगवेगळे उदाहरणे देऊन ते सोप्या पद्धतीने कसे सोडवता येईल याचे मार्गदर्शन केले तसेच त्यामध्ये विद्यार्थ्यांचे गट पाडून गटचर्चेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संख्याज्ञान जागृत करण्यात आले.सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक युगांधर भोयर यांनी स्वदेशी खेळाची माहिती देऊन कबड्डी,गिल्ली दंडा,रस्सीखेच यासारख्या वेगवेगळ्या स्वदेशी खेळांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग करवून घेण्यात आला.

स्वतःचा चौथ्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांनी लावणी,लेझिम,पोवाडा,भजन इत्यादी लोककला सादर केले. शिक्षण सप्ताहाच्या पाचव्या दिवशी कौशल्य दिवसाचे औचित्य साधून मातीकाम, इलेक्ट्रिकल,शेती,परसबाग यांची माहिती देऊन विद्यार्थ्यांमधील नवनवीन कौशल्य विकसित करण्यात आले.सहाव्या दिवशी शालेय परिसरामध्ये चिकू,आंबा,सागवान, कडुलिंब इत्यादी झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा विद्यार्थ्यांनी संकल्प केला आणि स्वतःच्या शेवटच्या दिवशी गावातील प्रतिष्ठित नागरिक प्रशांतजी राईंचवार, सामाजिक कार्यकर्ते सचिन संगीडवार आणि राजू व्यास यांच्याकडून विद्यार्थ्यांना भोजनदान करण्यात आला.

आयोजित सप्ताहात राबविलेल्या संपूर्ण उपक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये