Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीकृष्ण गोशाळा गुगळादेवी मंदिर परिसर येथून ७ गाई व १ नंदी याची चोरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

शहर लगत गुगळादेवी मंदिर परिसर गिरोली रोड येथील श्रीकृष्ण गोसंवर्धन ट्रस्ट द्वारा संचालित गोशाळे मधील सात गाई व एक नंदी (वळू) शनिवारी रात्री अज्ञात चोरट्याने चोरी केली.

     श्रीकृष्ण गोशाळा गुगळादेवी मंदिर परिसर येथे दिनांक २७ जुलै शनिवारच्या रात्री ते दि २८ जुलै सकाळी ६ वाजे दरम्यान अंधाराचा फायदा उचलत अज्ञात चोरट्याने तारचे वॉल कंपाऊंड तोडून गोशाळेत प्रवेश केला व गोशाळे मधील सात गायी आणि एक वळू चोरून नेले ही घटना दिनांक २८ जुलै रोजी सकाळी सात वाजता गोशाळे मधील रखवालदार यांच्या लक्षात आली त्यांनी या संदर्भात गोशाळेचे अध्यक्ष व संचालक मंडळ यांना माहिती दिली.

संचालक मंडळ यांनी घटनास्थळी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली.दे.राजा पोलीस स्टेशनला पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांची भेट घेऊन गोधनचोरी संदर्भात माहिती दिली. दि २८ जुलैला रात्री रीतसर पोलीस स्टेशनला रखवालदार गणेश विष्णू शिन्दे यांनी तक्रार दिली.गाडीवरून अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधिक तपास करीत आहे. यावेळी गोसंवर्धन शाळेचे अध्यक्ष राजेश तायडे संचालक भरत कुन्हे, आदर्श गुप्ता  ‘अविनाश भावसार’ किशोर पटेल, गणेश मीनासे, अर्पीत मिनासे या संचालका सह पत्रकार सुरज गुप्ता, सुनिल काटकर ‘राजू देशपांडे आदींची उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये