ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कावेरी नदीच्या पाणी वरून वाद, पोलीस बंदोबस्तात तमिळनाडूचे कार्यकर्ते परतीचा वाटेवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर :- कावेरी नदी चे पाणी तमिलनाडूला नाही दिले जात असल्या कारणावरून नवी दिल्ली येथे आंदोलन करण्यासाठी नॅशनल साउथ इंडियन रिवर इंटरलॉकिंग असोसिएशन, तामिळनाडू चे अध्यक्ष अय्याकन्नू हे आपल्या 75 कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यां सोबत (ज्यात 15 महिला आहे) ट्रेन नंबर 12615 जीटी एक्सप्रेस दिल्लीला जात होते. त्यांना दिल्लीला न जाऊ देता मध्य प्रदेश मधील नर्मदापुरम रेल्वे स्टेशनवर आरपीएफ, जीआरपी व स्थानिक पोलीस 400 कर्मचाऱ्यामार्फत ट्रेन मधून उतरून देण्यात आले आहे. तसेच त्यांना ट्रेन क्र. 16032 अंदमान एक्सप्रेसला 1 अतिरिक्त कोच जोडून चेन्नई ला पाठविण्यात येत आहे. सदर ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणावर आरपीएफ, जीआरपी त्यांच्यासोबत तैनात आहे. तरीपण त्यांना जबरदस्तीने चेन्नईला वापस पाठविले जात असल्याने ते हिंसक प्रदर्शन करू शकतात. त्यामुळे रेल्वे स्टेशनवर कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता सदर ट्रेन वर बंदोबस्त ठेवण्यात आले.

    या वेळी आरपीएफ चे निरीक्षक सुनील कुमार पाठक, बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिपक काँक्रिडवार, पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे, विक्की लोखंडे, सहायक पोलीस उपनिरीक्षक गजानन डोईफोडे, जीआरपी चे पोलीस उपनिरीक्षक नारनवरे यांनी चोख बंदोबस्त ठेवले होते. आरपीएफ चे निरीक्षक सुनील कुमार पाठक यांनी आंदोलन कर्त्याची जेवणाची सोय करून त्यांना जेवणाचे पॉकेट व पाणी बॉटल चे पुरवठा केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये