Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अज्ञाताद्वारे फिर्यादीची ऑनलाइन फसवणूक

फिर्यादीच्या तक्रारीवरून सायबर पो. स्टे.ला गुन्हा नोंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

फिर्यादी श्री. हर्षल शरदराव महाबुधे, वय ३१ वर्षे, व्यवसाय शेती, रा. साकुर्ली, (धानोली) यांचे पंजाब नॅशनल बँकेत खाते असुन दैनंदिन व्यवहाराकरीता फोन पे व गुगल पे चा व मोबाईल रिचार्ज करीता अॅमेझॉन पे सुध्दा मोबाईल मध्ये वापरतात. दि. १९.०५.२०२४ चे पहाटे झोपेतुन उठल्यानंतर फिर्यादी यांनी मोबाईल पाहीला असता फिर्यादीचे बँक खात्यातुन यु.पी.आय. मार्फत ३०,०००/- रू तिन, व १०,०००/- रू चे व्यवहार झाल्याचे संदेश दिसले. फिर्यादी यांनी मोबाईल मध्ये कोणतेही अॅप डाउनलोड केले नाही किंवा कोणतीही लिंक ओपन केली नाही. कुणाचेही फोन आले नाही. तरी कुणीतरी अज्ञाताने यु.पी.आय. ट्रांजेक्शन व्दारे ईतरत्र बँक खात्यात वळते केले. याबाबत नॅशनल सायबर काईम रिपोर्टीग पोर्टल वर तक्रार केली असता त्याअन्वये १५,०००/- रू होल्ड झाले. याप्रमाणे ८५,०००/- रू. फसवणुक झाली अशा आशयाचे फिर्यादीचे लेखी तक्रारीवरून सायबर पो.स्टे. वर्धा येथे ३०/२०२४ कलम ४२० भा.द.वि. सह कलम ६६(ड) माहीती तंत्रज्ञान कायदा गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

सदर गुन्हयाचे तपासात तांत्रीक विश्लेषणावरून फिर्यादींची फसवणुक झालेली रक्कम आकाश लालबाबु चौधरी, रा. भिलाई या नावाचे व्यक्तीचे कॅनरा बँक खात्यात मध्ये वळते झाल्याचे व आरोपी तोमेश लक्ष्मीनारायण निसाद, हा गुन्हयात सहभागी असल्याचे गुन्हयाचे तपासात निष्पन झाल्याने आरोपी ०१) आकाश लालबाबु चौधरी, वय २५ वर्षे, ०२) तोमेश लक्ष्मीनारायण निसाद, वय २७ दोन्ही रा. भिलाई जि. दुर्ग, (छत्तीसगढ) यांना दि. २७.०७.२०२४ रोजी भिलाई (छत्तीसगढ) येथुन ताब्यात घेवुन गुन्हयात अटक केली व आरोपींचे ताब्यातुन ०३ मोबाईल, ११ सिम कार्ड, १० ए.टी.एम. कार्ड व १३ चेक बुक व ४ बँक पास बुक एकुण जु.की. ९१,०००/- रू या मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी दि. ०५.०८.२०२४ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड मध्ये आहे. गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.

सदर गुन्हयाचा तपास मा. श्री. नूरूल हसन, पोलीस अधीक्षक सा. वर्धा, मा. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधीक्षक सा. वर्धा यांचे मार्गदर्शनात श्री. महेश चव्हाण, पोलीस निरीक्षक, पो.हवा./ निलेश तेलरांधे, अनुप राऊत, अमित शुक्ला, विशाल मडावी, अनुप कावळे, रणजित जाधव, वैभव कट्टोजवार, अक्षय राऊत व पो.शि./अंकीत जिभे, पवन झाडे, लेखा राठोड, प्रतिक वांदीले, यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये