Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लालगुडा जिल्हा परिषद शाळेत “शिक्षण सप्ताह” उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या वर्धापन दिनानिमित्त कोरपना तालुक्यातील गडचांदूर केंद्रांतर्गत असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथे दिनांक २२ ते २८ जुलै २०२४ या कालावधीत ‘शिक्षण सप्ताह’ चे आयोजन करण्यात आले.

          या शिक्षण सप्ताह अंतर्गत कृतिशील उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ चार भिंतीच्या आतील शिक्षण न मिळता बाहेरच्या जगातील शिक्षण मिळून कौशल्य प्राप्ती व विद्यार्थी स्वावलंबी होण्यास मदत झाली. शिक्षण सप्ताहात आठवड्याचा प्रत्येक दिवस एका विशिष्ट उपक्रमासाठी नियोजित करण्यात आला होता, ज्यात शिक्षण व विकासाच्या विविध पैलूंचा समावेश होता. अध्ययन -अध्यापन साहित्य दिवस, मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, क्रीडा दिवस, सांस्कृतिक दिवस, कौशल्य व डिजिटल उपक्रम दिवस, मिशन लाइफ च्या दृष्टिकोनातून इको क्लब आणि समुदाय सहभाग दिवस (तिथी भोजन /विद्यांजली , इ.)असे नाविन्यपूर्ण व वेगवेगळे उपक्रम घेण्यात आले.

        शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकी ज्ञानाबरोबरच सामान्य ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी शैक्षणिक, सांस्कृतिक व तंत्रज्ञान विषयक उपक्रमा बरोबरच लोकसहभागातून शाळेत विविध नवोपक्रमाचे आयोजन केले.

          हा शिक्षण सप्ताह यशस्वी करण्यासाठी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष फकरू मरस्कोल्हे,उपाध्यक्ष वर्षा कोडापे, सदस्य अमावस्या तोडासे,शिक्षण प्रेमी संतोष सिडाम,शाळेचे माजी विद्यार्थी प्रदीप शेडमाके,किरण कोडापे, त्रिशा मरस्कोल्हे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये