Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली येथील जि.प. शाळेला संरक्षण भिंतच नाही

जंगली डुकर व बेवारस कुत्र्यामुळे विद्यार्थ्यांचा जीवीतास धोका

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली येथे पंचायत समिती अंतर्गत दोन जिल्हा परिषदेच्या शाळा कार्यान्वीत आहेत. त्यात जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्र. 2 यांचा समावेश आहे. या दोन्ही शाळेतील पटसंख्या 180 आणि 83 अशी आहे. परंतु या दोन्ही शाळेत पक्की संरक्षण भिंत नसल्याने या शाळेतील विद्यार्थ्यांना जंगली डुकर व बेवारस कुत्र्यामुळे जीवीतास धोक निर्माण झालेला आहे. त्यामुळे पालकवर्गात भितीची वातावरण असुन शाळांना संरक्षण भिंतीसाठी लोकप्रतिनिधीनी निधी मंजुर करावा अशी मागणी पालकाकडुन केल्या जात आहे.

नुकताच सावली शहरात जंगली डुकराच्या हल्यात 1 ठार तर 6 जखमी झाले असल्याची घटना घडली त्यात 3 शाळकरी विद्यार्थ्यांचा समावेश होता. दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचा गावातच हौदोस वाढला आहे. दिवसा व रात्रीच्या वेळेस सुध्दा वन्यप्राण्यांचे दर्शन होत आहे. गावात येवून जंगली डुकरांनी धुमाकूळ माजवलेला आहे. तर शहरात बेवारस कुत्र्याची संख्याही कमालीची आहे. शाळेला संरक्षण भिंत नसल्याने जंगली डुकर व बेवारस कुत्र्यापासुन विद्यार्थ्यांच्या जिवीतास कधीही धोका होवू शकतो याची शक्यता नाकारता येत नाही.

अनेकदा शाळेला संरक्षण भिंत बांधण्यात यावी याकरीता शाळेतील मुख्याध्यापकांनी पत्रव्यवहार केला परंतु शहरातील जिल्हापरिषदेच्या दोन्ही शाळा नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येत असल्याने जिल्हा परिषदेकडुन कोणत्याही प्रकारचा निधी सदर शाळांना मिळत नाही. तर नगरपंचायतीला विचारणा केली असता शालेय निधी आमच्याकडे उपलब्ध नसल्याची बतावणी केली जात आहे. या दोन्ही प्रशासनामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असुन संरक्षण भिंती अभावी विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका निर्माण झाला असल्याने आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास पालकामध्ये दहशतीचे वातावरण पहावयास मिळत आहे. मराठी शाळेच्या पटसंख्येचा टक्का वाढविण्यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न सुरु आहेत मात्र त्यात मराठी शाळेचा दर्जा व भौतिक सुविधेसाठी शासनाकडुनच निधीकरीता पाठ फिरविली जात असल्याने मराठी शाळेतील पटसंख्येचा टक्का कसा वाढणार हा यक्ष प्रश्नच आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये