Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागभीड येथील उपविभागीय लघु सिंचाई जिल्हा परिषदची इमारत धोकादायक

तरी प्रशासनाचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

नागभीड येथील पंचायत समिती जवळ असलेल्या उपविभागीय लघु सिंच ई (जी प) उपविभाग नागभीडची इमारत रस्त्यालगत असून सर्व बाजूंनी पाणी साचून राहत असल्याने इमारत कार्यालयीन कामकाजाच्या दृष्टीने धोकादायक आहे.

सदर इमारतीसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगितले जाते मात्र त्यावर कोणतीही परवानगी किंवा सूचना देण्यात आली नाही. यामुळे पावसात शेजारी असलेले बाभूळ झाड पडले पण ते इमारतीच्या बाजूला पडल्याने ज्यावर शासकीय ध्वजारोहण केलेला खांब ची मोडतोड झाली आहे.

झाड जर कार्यालय इमारतीवर पडले असते तर फार मोठी दुर्घटना घडली असती. शासकीय कर्मचारी जीव मुठीत धरून कामे पूर्ण करीत आहे. जर पाऊस असाच पडत राहिला तर इमारत कोसळण्याचा संभाव्य धोका निर्माण झाला आहे. शासनाने सदर इमारतीतील कार्यालय पंचायत समिती येथे हलवावे तरच शासकीय कामे भीती न बाळगता करता येईल असे चित्र दिसून येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये