Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे जिल्हास्तर अजिंक्यपद योगासन स्पर्धा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       स्थानिक भद्रावती येथे जिल्हास्तर अजिंक्यपद योगासन स्पर्धा दिनांक 28 जुलै 2024 रोजी महायोगी श्री अरविंद सभागृह येथे पार पडली ही स्पर्धा विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि पतंजली योग समिती भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आली या स्पर्धेकरिता भद्रावती, वरोरा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, मूल, नागभीड, सिंदेवाही, राजुरा, बल्लारशा चंद्रपूर जिल्यातील विविध तालुक्यातील एकूण 90 योगपटूनी सहभाग नोंदविला स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. जी. उमाटे, प्रमुख पाहुणे भद्रावतीतील समाजसेवक प्रा. धनराजजी आस्वले, राष्ट्रीय पंच रवी रामटेक, नागपूर, राष्ट्रीय पंच संजय देशमुख, वर्धा, भगवानजी पालकर, ब्रह्मपुरी, तालुका प्रभारी, पतंजली योग समिती भद्रावती प्रकाश आस्वले, अनंता मत्ते, सुनील वैद्य, संयोजक शालेय क्रीडा समिती भद्रावती प्रकाश देरकर, सौ. शुभांगी डोंगरवार, समन्वयक चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट अससोसिएशन तानाजी बायस्कर, या स्पर्धेकरिता तांत्रिक बाजू सांभाळणारे चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे तांत्रिक अधिकारी व पंच उपस्थित होते.

या स्पर्धेचे आयोजन संचालक, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख प्रा. संगिता आर. बांबोडे यांनी केले.ही ट्रॅडिशनल इव्हेंट, आर्टिस्टिक इव्हेंट रिदेमिक इव्हेंट्स या प्रकारात घेण्यात आली. या स्पर्धेतून उत्कृष्ट योगपटू यांचे निवड महाराष्ट्र राज्य योगासन स्पोर्ट असोसिएशन द्वारा आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेकरीता ध्रुव हायस्कूल संगमनेर 16 व 17 ऑगस्ट 2024 रोजी होणार आहे निवड झालेला संघ राज्यस्तरीय स्पर्धेकरिता चंद्रपूर जिल्ह्यातून दिनांक 14 ऑगस्ट रोजी रवाना होत आहे राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झालेल्या सर्व योगपटूंना चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे पुढील स्पर्धेकरीता शुभेच्छा देण्यात आल्या जिल्हास्तरीय अजिंक्यपद योगासन स्पर्धा व निवड चाचणी घेण्याकरिता विवेकानंद ज्ञानपीठ (कॉन्व्हेंट) द्वारा संचालित या संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद शिक्षकेत्तर कर्मचारी, पतंजली योग समिती भद्रावती चे सर्व पदाधिकारी, हेल्पिंग हँड या एनजीओ चे सर्व पदाधिकारी, भद्रावती तालुका बॉक्सिंग असोसिएशनचे सर्व पदाधिकारी, चंद्रपूर जिल्हा जिम्नॅस्टिक असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि महाविद्यालयातील विद्यार्थीनी मोलाचे सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये