मा. न्यायालयाच्या निगराणीखाली ‘विशेष चौकशी समिती’ची स्थापना करावी – आम आदमी पार्टी
नोकर भरती परीक्षेत झालेले 'पेपरफुटी प्रकरण'

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धेत पेपर फुटी विरोधात गांधी पुतळा जवळ धरणे आंदोलन
आज राज्यात सर्वच स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याचे जवळपास रोजचे झाले आहे. पेपर फुटी प्रकरणात आम आदमी पार्टीने आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांनी आंदोलन केल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कुठलेही ठोस आश्वासन आंदोलनाच्या शिष्टमंडळाला दिले नाही, यामुळे आम आदमी पार्टीने राज्यभर “आक्रोश मोर्चा” धरणे निदर्शन काढून सरकारचे लक्ष वेधले आहे. आज वर्धा आम आदमी पार्टीच्या वतीने गांधी पुतळा जवळ पेपर फुटी विरोधात जोरदार निदर्शने व धरणे करण्यात आली.
हमखास सरकारी नोकरी मिळत असलेल्या स्पर्धा परीक्षांच्या तरुणांनी आज कोणाकडे न्यायाची अपेक्षा करायची असा प्रश्न आम्ही सरकारला विचारत आहोत. जर हे पेपर फुटीचे प्रकरण यापुढेही चालू राहिले तर आम आदमी पार्टी उग्र आंदोलन करेल. असा इशारा या अंदोलनातून सरकारला देण्यात आला.
देवेंद्र फडवणीस हे गृहमंत्री असताना सुद्धा या महत्वाच्या पेपर फुटी प्रकरणावर कुठल्याही प्रकाराची कठोर कारवाई अजून तरी फडवणीस यांनी केलेली नाही, त्यामुळे त्यांच्या भूमिकेवर संशय निर्माण होत आहे असा स्पष्ट आरोप आम आदमी पार्टीचा आहे.
आम आदमी पार्टीने सरकारकडे पुढील मागण्या केल्या आहेत
१. सदोष “तलाठी भरतीची परीक्षा रद्द करून, तलाठी तसेच सर्व परीक्षा “महाराष्ट्र लोकसेवा आयोग” (MPSC) मार्फत घेतल्या जाव्यात
२. नोकभरती परीक्षेत झालेल्या “पेपरफुटी”ची चौकशी करण्यासाठी ताबडतोब मा. न्यायालयाच्या निगराणीखाली “विशेष चौकशी समिती”ची स्थापना करून पुढील ४५ दिवसांत समितीला अहवाल सादर करावयास सांगावा
३. पेपर फुटीच्या विरोधात कठोर कायदे बनवावेत. पेपरफुटीतील गुन्हेगारांना “जन्मठेपेची शिक्षा” व रु. १० कोटी इतका कठोर दंड आकारण्याचा कायदा बनवावा.
५. सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण कायमचे रद्द करण्यात यावे.
आज शहादत दिनाचे औचित्य साधून गांधी पुतळ्या जवळ धरणे आंदोलन करण्यात आले त्या वेळी जिल्हा प्रमुख प्रमोद भोमले, शहर प्रमुख मंगेश शेंडे, प्रमोद भोयर,प्रमोद भेंडे तुळसीदास वाघमारे तारा बाई फूलहार अविनाश बंडे वार अरुण खुड सिन्गे दिवाकर कडू कर, मयुर राऊत योगेश ठाकुर,ई श्वर गायक वाड हर्सल सहारे,अमर शेंडे, प्रदीप न्हाले, प्रकाश भोयर, देवाणांद चौधरी, मोहन देशमुख,वासुदेव राठोड,पंकज सत्य कार,धं न जय अग्रवाल,सदानंद थू ल विजय गव्हाणे,नागर्जुन देशमुख रवि कांबळे, पद्माकर कांबळे प्रकाश डोडा नी,प्रवीण धांदे आदी उपस्थित होते.



