ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पो.स्टे सेलू येथिल शेतकऱ्यांचे मोटार पंप चोरी करणारी आरोपीतांची टोळी जेरबंद

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 05/02/2024 रोजी च्या रात्र दरम्यान मौजा खापरी व जुनगड शेत शिवारातील नाल्यातून व विहीरीतून शेतकरी नामे सुधाकर वासकर, मोरेश्वर वासकर, वसंतराव वासकर तिन्ही रा. खापरी तसेच जितेंद्र उरकुडे रा. जुनगड यांनी शेतीच्या पिकांना पाणी ओलीता करिता लावलेल्या 5 सबमर्सिबल व 1 पाण्यावरील मोटर पंप काही अज्ञात चोरटे चोरुन नेल्याने वसंतराव गोविंदराव वासकर रा. खापरी यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. सेलू येथे अज्ञात चोरट्यांविरध्द कलम 379 भादवीचा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान गुप्त बातमीदार यांचेकडून मिळालेल्या माहीतीवरुन आरोपी नामे 1)शिवाशिष अशोक सराटे, वय-23 वर्ष, 2) सुरज सुरेशराव मुंडेकार वय-21 वर्ष, दोन्ही रा. जवाई नगर वरुड जि.वर्धा, 3) अभिजीत संजय भेदरकर, वय-22 वर्ष, 4) यश गजानन इंगोले, वय-19 वर्ष, दोन्ही रा. सोमनाथे लेआऊट सिंदी मेघे वर्धा, यांना पो.स्टे सेलू येथिल पोलिस निरीक्षक मंगेश भोयर यांच्या मार्गदर्शनात पोलीस अमंलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे यांनी ताब्यात घेवुन विचारपुस केली असता सदरचा गुन्हा वरील आरोपीतांनी संगणमताने केल्याची कबूली दिल्याने सदर आरोपीतांचे ताब्यातून सदरचा चोरीस गेलेल्या 1)जुन्या वापरत्या 3 HP च्या पाण्यातील 04 मोटार पंप 2) 01 पाण्याबाहेरील मोटार पंप 3) 5 HP ची एक पाण्यातील मोटार एकूण 6 मोटर पंप जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात सपोनि. मंगेश भोयर ठाणेदार पो.स्टे. सेलु यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार गणेश राऊत, ज्ञानदेव वनवे, पो.स्टे सेलू यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये