सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी ची नोंद करावी – तहसीलदार प्रवीण धानोरकर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे
सद्द स्थितीत तालुक्यात खरीप पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे. शेतातील ई पीक पाहणी सात बारा सदरी लावण्याची सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेली आहे. खरीप पिक पाहणी २०२४ या हंगामातील शेतकरी स्तरावरील ई पिक पाहणी नोंदविण्याचा कालावधी दिनांक १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर पर्यंत आहे, पीक विमा योजना, पीक कर्ज, कृषी विभागाच्या विविध प्रकारच्या योजना, नैसर्गिक आपत्तीचे अनुदान वाटप, नाफेड केंद्रांवर शेतमाल विक्री साठी सात बारा वर पिकाची नोंदणी करणे बंधनकारक आहे.
तरी या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व शेतकरी बांधवांना आव्हान करण्यात येत आहे की, आपल्या शेतामध्ये मोबाईल एप द्वारे ई पीक पाहणी करून घ्यावी. काही अडचण आली तर आपल्या गावातील तलाठी किंवा कोतवाल यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे. सिंदखेड राजा तालुक्यांतील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी विहित मुदतीत मोबाईल एपं द्वारे जास्तीत जास्त नोंदणी करून ई पीक पाहणी करावी असेआवाहन सिंदखेड राजा चे तहसीलदार प्रविण धानोरकर यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.