Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रात्री अवैध वाळू चोरी करणारे दोन टीप्पर

महसूल विभागाचे पथक पाहताच पळाले 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

खडकपूर्ना नदी पात्र मधून होत असलेल्या अवैध रेती उत्खनन करून चोरी करणाऱ्या व्यक्ती विरोधात कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांच्या नेतृत्वाखाली दोन महसूल पथके तयार केली.एका पथकामध्ये स्वतः तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, तलाठी एम ए उदार, मंडळ अधिकारी के बी इप्पर, होते तर दुसऱ्या पथकामध्ये नायब तहसीलदार प्रांजल पवार, तलाठी ज्योती लोखंडे, कोतवाल अंबादास पैठणे, शरद काकडे, कविता शिरसाठ होत्या, दोन्ही पथके १८जुलै ला रात्री ९.३०वाजता खाजगी वाहनाने निघाले ,चिंचखेड कडे जाणाऱ्या रोडने जात असताना मंडपगाव रोडवरील गारवा हॉटेल जवळ रात्री १०.३०वाजता वाळू भरलेले दोन हायवा टीप्पर रोडने जाताना दिसले, तेव्हा पथकाने हात देऊन सदर टीप्पर चालकास थांबण्यास सांगितले असता दोन्ही चालकाने टीप्पर चा वेग कमी केला तेव्हा चालकाने पथक पाहताच दोन्ही टीप्पर जोरात पळून गेले, मात्र पथकाच्या गाडी चे लाईट मुळे दोन्ही टीप्पर चे क्रमांक मिळाले एम एच २८बी बी ४४६७ व ओ डी १८जी ३९२५ होते.

या अवैध रेती चोरी विरोधात १९जुलै ला पहाटे अंढेरा पोलिस ठाण्यात तलाठी संजय धांडे यांनी वाळू चोरी करणाऱ्या टीप्पर चालक व मालकाविरोधात तक्रार दाखल केली असून दोन्ही टीप्पर मध्ये प्रत्येकी २०हजार असे एकूण ४०हजार रुपयाची वाळू असल्याचे म्हंटले आहे, पोलिसांनी अज्ञात वाहन चालक व मालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल सिद्धार्थ सोनकांबळे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये