ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून रस्त्याकरिता ५५कोटी रुपयांचा निधी मंजूर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांच्या प्रयत्नातून मुख्यमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत सिंदखेड राजा मतदार संघातील विविध रस्त्याकरीता ५५कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राष्ट्रीय महामार्ग ते जयपूर गारखेड पावेतोच्या ३.१०० किमी रस्त्या साठी ४ करोड १८लाख रुपये,राष्ट्रीय महामार्ग ते केशव शिवणी वाकद ३.०१५ किमी रस्त्यासाठी ४करोड ८६ लाख रुपये,राज्य महामार्ग ते बाळसमुद्र या ३.८०० किमी रस्त्यासाठी ५ कोटी ४०लाख रुपये,राज्य महामार्ग ते देऊळगाव कोळ कुंभेफळं या ४.२८० किमी रस्त्यासाठी ५ करोड ३३लाख रुपये,प्रजिमा ते पिंपलखुटा या ५ किमी रस्त्यासाठी ६ कोटी ६२ लाख रुपये,प्रजीमा ते पिंपळगाव बू ते जिल्हा सीमा या ५.८००किमी रस्त्यासाठी ७कोटी १० लाख रुपये,प्राजिमा ते चिंचखेड सुलतानपूर या ५.१०० किमी रस्त्यासाठी ६ कोटी ८८लाख रुपये राज्य महामार्ग ते किनगाव जत्तु ते खापरखेड या३.०५० किमी रस्त्यासाठी ५करोड ८लाख रुपये राष्ट्रीय महामार्ग ते अंचरवाडी ते शेळगाव या ६.८००किमी रस्त्यासाठी९कोटी ५४लाख रुपये मंजूर झाले आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याबद्दल गावकऱ्यांनी आमदार डॉ राजेंद्र शिंगणे यांचे अभिनंदन करून आभार मानले आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये