Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली तालुक्यातील लोंढोली परिसरातील बिएसएनएल टॉवरमध्ये बिघाड

लाडकी बहिण योजनेचा अर्ज करताना अडचणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

       सावली तालुक्यातील लोंढोली गावामध्ये असलेल्या BSNL टॉवरमध्ये मागील एक महिन्यापासून बिघाड आल्यामुळे BSNL चे सिमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

   गावात बीएसएनएल चे टॉवर असल्याने परिसरातील नागरिकांसह गावातील नागरिक,सेतू केंद्र,ग्रामपंचायत,आरोग्य केंद्र, जी.प.शाळा आणि माध्यमिक शाळा या सर्वांनी आपआपल्या सोईसाठी बीएसएनएल चे सिम घेऊन ऑनलाईन कामात कोणतीही अडचण जाणार नाही असे वाटत असताना मागील एक महिन्यापासून टॉवर बंद असल्याने गावातील कार्यालयात नुकत्याच महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या लाडकी बहीण योजनेचा अर्ज करताना परिसरातील लाडक्या बहिणीला अडचणीचा सामना करावा लागत आहे.मागील एक महिन्यापासून bsnl ची सेवा बंद असल्याने परिसरातील नागरिक ऑनलाईन कामाकरीता तालुक्याच्या ठिकाणी येऊन करताना दिसत आहेत,त्यामुळे त्यांना आर्थिक,शारीरिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.

 BSNL अधिकारी वर्गाला ही बाब तेथील स्थानिक नागरिकांनी वारंवार सांगून आणि तक्रार करूनही याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसत आहेत.आज करू, उद्या करू असं म्हणत असताना तब्बल एक महिना लोटूनही दुरुस्ती करून देत नसल्याने परिसरातील नागरिकांची बोंब आहे.

सदर समस्या ही गंभीर असून अधिकारी वर्गांनी या समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन खंडित BSNL सेवा सुरळीतपणे चालू करावी अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये