Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संगणक आणि मोबाईलचा योग्य वापर केल्यास भविष्य उज्वल – जीवन राजगुरू

स्व. वामनरावजी गड्डमवार स्मृती दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली : सध्याचा काळ हा मोबाईल आणि संगणकाचा काळ आहे. मोबाईल आणि संगणकाचा योग्य वापर केल्यास भविष्य घडविणे सहज शक्य आहे परंतू गैरवापर केल्यास भविष्य अंधारमय होण्यास वेळ लागणार नाही. याचा विचार करून देशाचे भावी नागरीक असलेल्या विद्यार्थ्यांनी जीवनात काय योग्य आणि काय वाईट याचा विचार करावा. असे मत पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू यांनी केले.

       स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पार पडलेल्या लोकनेते स्व. वामनरावजी गड्डमवार यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमात ते बोलत होते. भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सचिव राजाबाळपाटील संगीडवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमाला नायब तहसिलदार अनमोल कांबळे, पोलीस निरीक्षक जीवन राजगुरू, तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ. रविंद्र चौधरी, संस्थाध्यक्ष संदीप गड्डमवार आदि मान्यवर उपस्थित होते. स्व.वामनरावजी गड्डमवार यांच्या पुर्णाकृती पुतळयास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. संस्थेचे अंकेक्षक सुनिल बल्लमवार यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नायब तहसिलदार अनमोल कांबळे यांनी स्पर्धा परिक्षे विषयी मार्गदर्शन केले. शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत ग्रामीण भागातील विद्यार्थी आज मागे राहीलेले नसून परीश्रम करण्याची तयारी, सकारात्मक दृष्टीकोन आणि मनाशी जिद्द बाळगल्यास स्पर्धा परिक्षेत यश संपादन करणे शक्य आहे. असे मत व्यक्त केले. यावेळी तालुका वैद्यकिय अधिकारी डाॅ. रविंद्र चौधरी, संस्थेच्या उपाध्यक्ष नंदाताई अल्लुरवार यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना संस्थेचे सचिव राजाबाळ संगीडवार यांनी सुसंस्कृत आणि जबाबदार नागरीक घडविण्यासाठी स्व.वामनरावजी यांनी ग्रामीण भागात शैक्षणीक संस्थाची निर्मिती केली असून आज मंडळातंर्गत सर्व शैक्षणीक संस्था उत्तम कार्य करीत असल्याने समाधान व्यक्त केले. कार्यक्रमा दरम्यान मंडळाद्वारे संचालीत विश्वशांती विद्यालय सावली, मारोडा, कुनघाडा, भेंडाळा आणि बोथली येथील इयत्ता दहावी आणि बारावी मध्ये गुणवंत ठरलेल्या विद्याथ्र्यांचा मान्यवरांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यांत आला. तसेच सावली तालुक्यात इयत्ता दहावी मध्यें प्रथम आलेल्या खुशी उंदिरवाडे आणि बारावीमध्यें प्रथम आलेल्या काजल प्रधाने यांचाही सत्कार करण्यांत आला. तालुक्यातील भानापूर येथील विद्यार्थीनी प्रिया यशवंत ताडाम यांची लंडन विद्यापीठात कायदयाचा अभ्यास करण्याकरीता निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यांत आला. कार्यक्रमाचे संचालन राजु केदार, धनंजय गुरनूले आणि काजल बारापात्रे यांनी केले तर उपस्थितांचे आभार वनिता गेडाम यांनी मानले.

कार्यक्रमाला मंडळाच्या उपाध्यक्ष नंदाताई अल्लुवार, अनिल स्वामी, संजय शृंगारपवार, संजीव गड्डमवार, डाॅ. ए. चंद्रमौली, ज्योती शृंगारपवार, अजय गड्डमवार, रितेश जिडगेलवार, वसंत अल्लुरवार यांचेसह मंडळाद्वारे संचालीत विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक तथा शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि निमंत्रीत मोठया संख्येनी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये