ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महावीर इंटरनॅशनल केंद्राच्या सुवर्णजयंती महोत्सवानिमित्त निःशुल्क आरोग्य तपासणी

महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्र व बालाजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर

      महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्र व बालाजी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने महावीर इंटरनॅशनल केंद्राच्या सुवर्णजयंती महोत्सवानिमित्त निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन १४ जुलैला सकाळी १० ते दुपारी २ वाजेपर्यंत स्थानिक बालाजी हॉस्पिटल जिल्हा परिषदेसमोर, हवेलि कॉम्प्लेक्सच्या मागे चंद्रपूर येथे करण्यात आले आहे.

        या शिबिरामध्ये मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. वैद्यकीय सल्ल्यानुसार काही आजारांची सोनोग्राफी, एक्सरे, रक्त तपासणी करायची असल्यास त्यावर ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.

       शिबिरामध्ये जनरल सर्जन डॉ. सतीश तातावार, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अप्रतिम दीक्षित, ह्दयरोग तज्ज्ञ डॉ. प्रदीप वरघने, मूत्र विकार तज्ज्ञ आनंद बैद, दंतरोग तज्ज्ञ डॉ. यश जैन आदि उपचार करणार आहेत. नागरिकांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावीर इंटरनॅशनल चंद्रपूर केंद्राचे प्रमुख मार्गदर्शक दिलीप भंडारी, अध्यक्ष त्रिशूल बंब, प्रकल्प निर्देशक निर्मल भंडारी, प्रकल्प निर्देशक विशाल कल्लुरवार, सचिव प्रसन्न बोथरा आदींनी केले आहे.

शिबीरातील सुविधा

     बी.पी., वजन, इ.सी.जी., रक्त तपासणी, मधुमेह (SUGAR) तपासणी, हाडाची तपासणी, हाडाचे दुखणे, गुडघे दुखी/पाठ दुखी, हृदयाची तपासणी, मुत्र विकार तपासणी, किडनी स्टोन, प्रोस्टेट, दंत तपासणी इ. तपासणी केली जाणार आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये