Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मोबाईल टावरची रेंज लवकरात लवकर वाढवावी – गावकऱ्यांची मागणी 

डॉ.अभ्युदय मेघे यांच्या नेतृत्वात निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

ग्रामीण भागात अजूनही मोबाईलच्या अपुऱ्या नेटवर्कमुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. असाच काहीसा प्रकार वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील वडगाव खुर्द कला येथे मोबाईलचे नेटवर्क मुबलक प्रमाणात मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकरिता गावकऱ्यांनी डॉ.अभ्युदय मेघे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी वर्धा यांना निवेदन दिले.

लवकरात लवकर गावातील नेटवर्क सुधारून विद्यार्थ्यांना शिक्षणाचा मार्ग सुखकर होण्यासाठी हे निवेदन देण्यात आले. यावेळी गावकरी व जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद देखील झाला. यावर लवकरात लवकर तोडगा काढू असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. यावेळी निवेदन देताना गावातील नागरिक हरीश पारीसे, जीवन महाकाळकर, बंटी खोबे, मंगेश वानखेडे,शुभम लुंगे, सुशांत वानखेडे, गौरव तळवेकर,मनीष तेलरांधे, शशिकांत पिंजरकर,नरेंद्र धनुले,राजू गजभिये, सुभाष येलोरे,नितीन धनुले, पापू बोबडे, रणजित महाकाळकर,शैलेश राऊत,राहुल कंबाले,तुषार कंबाले, अनील बंडे,विलास राऊत,अनिल नर्ताम,विजय मुळतकर यांची उपस्थित होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये