ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

व्हॉइस ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

           इंडिया विकास आघाडीचे शरद पवार गटाचे तुतारी या चिन्हावर निवडून आलेले युवा तरुण तडफदार वर्धा लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार मा श्री अमर जी काळे साहेब यांना निवेदन सादर करतांना मी स्वतः ज्येष्ठ समाजसेवक तथा शिवा संघटना वर्धा जिल्हा प्रमुख श्री सुरेश पट्टेवार 2014 पासून राज्यात व केंद्रात भाजपची बहुमताची सरकार स्थापन झाली आणि प्रत्येक आमदारांनी व खासदारांनी आप आपल्या क्षेत्रात हजारो करोड रुपयांची विकासकामे पूर्ण केली यात कुठलीही शंका नाही परंतु आर्वी तालुक्यातील खरांगना, मोरांगना येथुन चार किलोमीटर वर असलेल्या महाकाली मंदिरात जाणारा रस्ता आजपावेतो निर्माण करण्यात आला नाही ठिकठिकाणी खड्ड्याचे साम्राज्य असल्याने देवीच्या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांना आवागमन करणे सोयीचे व्हावे व आम्हा पट्टेवार दाम्पत्यांचे काचनूर व खरांगना ,मोरांगना हे माहेर असल्याने आमच्याकडे सतत सदर रस्त्याबाबत येत असलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने काचनूर च्या समोरील महाकाली मंदिर चौक ते श्री किशोर भाऊ माथनकर यांनी बांधलेल्या महाकाली मंदिरापर्यंत उखडलेल्या रस्त्याचे नवीन सिमेंट काँक्रीट रस्ता किंवा डांबरीकरण करावे याबाबत नवनिर्वाचित खासदार मा श्री अमर जी काळे यांना निवेदन सादर केले.

           वरील कार्यक्रमाला वर्धेतील ज्येष्ठ पत्रकार श्री हरिभाऊ वझुरकर, व्हॉइस ऑफ इंडियाचे विदर्भ प्रमुख श्री संदीप खाटीक,अजित पवार गटाचे मुख्य समन्वयक श्री राणा भाऊ रननवरे,उद्धव ठाकरे गटाचे वर्धा विधानसभा प्रमुख श्री निहाल पांडे,खासदार श्री अमर काळे,भाजपाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव सौ सरिता विजय गाखरे, एम आय डी सी वर्धा चे अध्यक्ष श्री प्रवीण हिवरे,दुर्गा टॉकीज संचालक श्री प्रदीप बजाज,मा अनुसया मंगल कार्यालय प्रमुख श्री बाबू टोनपे,हितवाद व महासागर चे निर्भीड पत्रकार मूर्ती लहान पण कीर्ती महान असे श्री नरेंद्र देशमुख व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये