Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नदीचे पुलावर सराफा व्यापाऱ्यास लुटणाऱ्या व दरोडा घालणाऱ्या गुन्हेगारांना २४ तासाच्या आत अटक

सोन्या-चांदीचे दागिने व ईतर मुददेमालासह एकुण १५ लाख ३२ हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पो. स्टे. हिंगणघाट येथे फिर्यादी सुभाष विनायक नागरे, वय ४३ वर्ष, व्यवसाय सराफा दुकान, रा. संत ज्ञानेश्वर वार्ड, हिंगणघाट, यांनी दिनांक ०६/०७/२०२४ रोजी तक्रार दिली कि, ते दिनांक ०५/०७/२०२४ रोजी त्याचे वडनेर येथील सौभाग्य ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान रात्री २०:०० वाजता बंद करून सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा ऐवज तसेच हिशोबाच्या डायऱ्या व चाब्यासह बॅगमध्ये भरून मोटर सायकलनी हिंगणघाटकडे एकटेच येत असतांना वणा नदीचे पुलावर अंदाजे २१:०० वाजता दरम्यान एका पल्सर २२० मोटर सायकलवरील तीन अनोळखी ईसमांनी त्यांला अडवुन त्यांचेवर चाकुने वार करून जख्मी केले व त्याचे जवळील सोन्या-चांदीचे दागिने व रोख ७१,०००/- रूपये तसेच हिशोबाच्या डायऱ्या, दुकानाची चाबी असा एकुण १३,४३,९६० /- रूपयाचा ऐवज जबरीने हिसकावुन चोरून घेवुन पळुन गेले. अश्या फिर्यादीचे रिपोर्टवरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अपराध क्रमांक ८९०/२०२४ कलम ३०९ (६), ३(५) भारतीय न्याय संहिता सन २०२३ अन्वये गुन्हा नोंद असुन तपासावर आहे.

मा. पोलीस अधिक्षक सा. श्री. नूरूल हसन सा. यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळी भेट देवुन स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व पोलीस अंमलदार यांची ०४ पथके तयार करून गुन्हयातील आरोपी निष्पन्न करण्याबाबत आदेश दिले. सदर गुन्हयाचे गांर्भीर्य ओळखुन मा. वरीष्ठांनी दिलेल्या निर्देषाप्रमाणे सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा कडुन समांतर तपास करीत असतांना फिर्यादी याचे वडनेर येथील सोन्या-चांदीचे दुकानाचे सभोवती असलेल्या सिसीटीव्ही कॅमेरा फुटेजचे बारकाईने निरीक्षण करून व गोपणीय माहितीच्या आधारे गुन्हयात संशईत ईसमनामे १) सुरेश राजु ईटनकर, वय २६ वर्ष, २) कुणाल दशरथ दुर्गे वय २३ वर्ष, रा. दोन्ही वडनेर, यांना ताब्यात घेवुन गुन्हयासंबंधाने गुन्हे तपास कौशल्याचा वापर करून सखोल विचारपुस केली असता त्यांनी त्यांचे गावातील मुख्य आरोपी नामे ३) आनंदसिंग उर्फ गोलु पंजाबसिंग टाक, वय २४ वर्ष रा. वडनेर, याचेसह मिळुन गुन्हयाचा कट रचुन घटनेच्या दिवशी दिनांक ०५/०७/२०२४ रोजी आंनदसिग टाक याला फिर्यादी रात्री ०८.०० वाजता दरम्यान दुकान बंद करून सोन्या-चांदीचे दागिन्यासह बॅग सोबत घेवुन एकटाच मोटरसायकलनी हिंगणघाटकडे निघाल्याची फोनव्दारे माहिती देवुन त्याचा पाठलाग केला. गुन्हयाचे कटाप्रमाणे फिर्यादीची वेळोवेळी फोनव्दारे माहीती देवुन वणा नदीचे पुलावर दबा धरून बसुन असलेले आरोपी ३) आनंदसिंग उर्फ गोलु पंजाबसिंग टाक, वय २४ वर्ष रा. वडनेर, त्याचा साळा ४) दिलेरसिंग उर्फ हडडी नेपालसिंग बावरी, वय १९ वर्ष ५) रणविरसींग उर्फ विरा कालुसिंग भादा, वय २३ वर्ष, रा. दोन्ही शिखबेडा, सांवगी मेघे, वर्धा यांना दिली. ठरल्याप्रमाणे फिर्यादी हे वणा नदीचे पुलावर येताच दबा धरून बसलेल्या तिन्ही आरोपीतांनी त्याचेजवळ असलेल्या २२० बजाज पल्सर मोटर सायकलनी अडवुन रणविरसिंग भादा याने फिर्यादी यास त्याचे जवळ असलेल्या गुप्तीने मांडीवर भोकसुन जख्मी करून खाली पाडुन फिर्यादी जवळील सोन्या-चांदीची बॅग व नगदी पैसे असा ऎवज जबरीने हिसकावुन घेवुन पळुन गेले.

सदर गुन्हा हा अंत्यत क्लिस्ट व गंभीर स्वरूपाचा असल्याने त्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी अत्यंत सचोटीने तपास कौशल्याचा वापर करून कुठलाही पुरावा उपलब्ध नसतांना सदर गुन्हयात २४ तासाचे आत गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून आरोपी नामे १) आनंदसिंग उर्फ गोलु पंजाबसिंग टाक, वय २४ वर्ष रा. वार्ड न. ०५, आंबेडकर चौक, वडनेर, २) दिलेरसिंग उर्फ हडडी नेपालसिंग बावरी, वय १९ वर्ष रा. शिखबेडा, सावंगी मेघे व त्याचा नातेवाईक ३) रणविरसींग उर्फ विरा कालुसिंग भादा, वय २३ वर्ष, रा. शिखबेडा, सांवगी मेघे, वर्धा ४) सुरेश राजु ईटनकर, वय २६ वर्ष, रा. वार्ड न. ०१, कन्या शाळेजवळ, वडनेर, ता. हिंगणघाट, जि. वर्धा ५) कुणाल दशरथ दुर्गे वय २३ वर्ष, रा. वार्ड न. ०१, हनुमान मंदीर जवळ, वडनेर, ता. हिंगणघाट, जि वर्धा, यांना अटक करून त्याचेपासुन गुन्हयातील जबरीने हिसकावलेला मुद्देमाल १) सोन्याचे (पिवळया) धातुचे दागिने एकुण वजन १८८.९७ ग्रॅम किंमत रूपये १२,९४,४२३/- २) चांदीचे (पाढऱ्या) धातुचे दागिने एकुण वजन ३८.५०० ग्रॅम किंमत रूपये ३,९९९/- ३) गुन्हयात वापरलेला गुप्ती, किमत ५००/- रू ४) गुन्हयात वापरलेली वाहन एक २२० बजाज पल्सर मोटर सायकल क्र एम. एच. ४९ ए. डी. ३१९८ किंमत १,००,०००/- रूपये, ५) जबरीने हिसकावलेली नगदी रक्कम ३७,७५० रूपये, ६) आरोपीतांचे गुन्हा करतांना वापरलेले ०५ अँड्राईड मोबाईल किंमत ९६,०००/- रूपये, ७) फिर्यादीची बॅग, ज्यामध्ये हिशोबाच्या ०३ डायऱ्या व दुकानाच्या चाब्या, एक बँकेचे पासबुक, एक खाली पर्स ज्यावर सौभाग्य ज्वेलर्स लिहुन असलेले, फिर्यादी याचे आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्ड, लायसन्स, गाडीचे आरसीबुक, एटीएम कार्ड, असा एकुण जु. किंमत १५,३२,६७३/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा दरोडयाचा असल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्हयात कलम ३११, ६१ भारतीय न्याय संहिता सन २०२३ वाढविण्यात आले.

सदरची महत्वपुर्ण कारवाई मा. श्री. नूरूल हसन. पोलीस अधीक्षक वर्धा, मा. डॉ. श्री. सागर कवडे, अपर पोलीस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री संजय गायकवाड,पोउपनि श्री अमोल लगड, सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार संतोष दरगुडे, गजानन लामसे, चंद्रकांत बुरगे, सचिन इंगोले, यशवंत गोल्हर, भुषण निघोट, प्रमोद पिसे, महादेव सानप, पवन पन्नासे, रितेश शर्मा, मनीष काबंळे, रामकिसन ईप्पर, राकेश आष्टनकर, गोपाल बावणकर, मंगेश आदे, अरविंद इंगोले, हर्षल सोनटक्के सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली. सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस स्टेशन हिंगणघाट येथिल डि बी पथक प्रमुख पोउनि भारत वर्मा, पोहवा प्रविण देशमुख, प्रशांत ढोबरे व त्याचे अधिनस्त पोलीस अंमलदार करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये