Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

म. रा. मराठी पत्रकार संघाच्या तालुका अध्यक्षपदी सतिश शिंदे तर सचिव पदावर ॲड. राहुल थोरात

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईच राजुरा शाखेची सभा रविवार दिनांक 07 जुलै रोजी पार पडली. ह्या सभेत विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. म. रा. मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष महेश पानसे यांच्या सुचनेनुसार संघाच्या कार्यप्रणाली प्रमाणे नवीन वर्षात सामाजिक उपक्रम घेणे, संघ आर्थिकदृष्ट्या मजबूत करणे, नवीन सदस्य जोडणे आदी विषयांवर चर्चा करून ठराव घेण्यात आले, तसेच कार्यकारणीचा कार्यकाळ संपल्याने नवीन कार्यकारिणी गठित करण्याच्या सुचनेनुसार संघाचे मार्गदर्शक प्रा. अनंत डोंगे ह्यांचे अध्यक्षतेखाली लोकशाही पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात आली.

ह्या निवडणुकीत सतीश शिंदे यांची अध्यक्ष पदी तर सचिव पदावर ॲड. राहुल थोरात, उपाध्यक्ष पदी प्रवीण मेकर्तीवार, कार्याध्यक्ष संतोष मेश्राम यांची निवड करण्यात आली. ह्याशिवाय कैलास कार्लेकर सहसचिव, राकेश कलेगुरवार कोषाध्यक्ष, लोकेश पारखी संघटक, अंकुश भोंगळे प्रसिद्धी प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. पत्रकार संघाच्या कार्यकारणी सदस्यांमध्ये रत्नाकर पायपरे, संजय रामटेके, ओंकार आस्वले, विजय जुलमे, अनिलकुमार गिरमिल्ला, गौरव कोडापे, यांचा समावेश आहे. पुर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे तसेच जिल्हाध्यक्ष जितेंद्र चोरडिया यांनी नवनियुक्त पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये