ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

17 वी बटालियन महार रेजिमेंट चा 46 वा स्थापना दिवस थाटामाटात संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

बुलढाणा जालना उत्सव समितीच्या वतीने देऊळगाव राजा येथे योगीराज लॉन्स येथे 46 वा स्थापना दिवस १७ योद्धा स्नेहसंमेलन महोत्सव आयोजित करण्यात आला

संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेले 17 वी बटालियनचे माजी सैनिक परिवार एकमेकांना भेटून आनंदित झाले अनेक जण सेवानिवृत्तीनंतर पुन्हा अलग अलग क्षेत्रामध्ये कर्तव्यावर आहेत तर कोणी व्यवसायामध्ये एक पाऊल पुढे तर काही माजी सैनिकांचे मूलं सुद्धा नोकरीवर आहेत

कर्तव्यावर असतानाची शिस्त आजही कायम आहे परंतु काही जणांचे पोटावरचे नियंत्रण सुटलेले आहे मनसोक्त मौजमस्ती करताना दमछाक होत होती परंतु आनंदाच्या भरात सर्व सैनिक परिवार संस्कृतीक कार्यक्रमाच्या माध्यमातून आनंद घेत होते

देशभक्ती गीते ,भीम गीते, सदाबहार गीतांचा आनंद घेत 30 जून च्या रात्री साडेबारा पर्यंत वाजेपर्यंत आनंदमय वातावरण होते स्नेहभोजनानंतर सतराव्या बटालियनच्या 46 व्या स्थापना दिवसाचा भव्य केक कापून उत्सव साजरा करण्यात आला

एक जुलैला सकाळीच बौद्धाचार्य गौतम खरात साहेब यांनी बौद्ध पूजा, पंचशील घेऊन व्यासपीठावरील अतिथीच्यां हस्ते दीप प्रज्वलन केले,

या प्रसंगी देऊळगाव राजा पोलिस ठाणेचे ठाणेदार संतोष महल्ले साहेब प्रमुख पाहुणे सुभेदार प्रभु वाघमारे साहेब 1971 च्या भारत पाकिस्तान च्या लढाई मधील विजयी जेष्ठ माजी सैनिक 7 महार रेजिमेंट , तसेच

माजी सैनिक भगवानराव चाटे ,भीमराव उबाळे ,श्रीधर मांटे , भीमराव चाटे , रंजन वाघ , शिवराम मांटे , उत्सव समिती अध्यक्ष सुभेदार गुलाब मस्के ,

 सुनील सुरडकर , दिनकर चंदनशिवे ,अनिल तेलंग , आत्माराम खरात, समाधान वेव्हल , संजय सगट , शंकर वाडे ,कचरू लहाने अनिल पठ्ठे ,संजय नाटेकर, संजय मांडवे, पी के मोरे ,विजय बोर्डे ,सर्व उत्सव समिती सदस्य सोबत महाराष्ट्रभरातून आलेले महार रेजिमेंटचे सेवेन्टीन योद्धा सैनिक परिवार हजर होते त्यांना तसेच 1971 च्या लढाई व 1999 कारगिल मध्ये शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी आयु कांताबाई नानभाऊ लहाने, आयु संगिता अशोक म्हस्के , वंदना सदाशिव वाकोडे , यांचे मोमेंटो , पुष्पगुच्छ, बुके , साडी चोळी देऊन, सम्मान करण्यात आला,

कार्यक्रमाचे प्रास्ताविक काशिनाथ भिसे , सूत्रसंचालन रमेश वाघमारे , यांनी केले तर आभार प्रदर्शन रामलाल पवार यांनी केले, महार रेजिमेंट चा इतिहास विशाल दिनकर चंदनशिवे यांनी सांगितला महार गान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली व कार्यक्रम संपल्यानंतरही माजी सैनिक पोलीस दिनकर चंदनशिवे यांच्या घरी सर्व सैनिक परिवार ताफा आनंद घेण्यासाठी मुक्कामी होता सर्व सैनिक परिवारांनी चिखली रोडवरील अमर जवान स्मारकावर शहिदांना अभिवादन केले , ठाणेदार संतोष महल्ये यांनी कार्यक्रमाचे खूप कौतुक केले असे भीमराव चाटे यांनी कळविले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये