ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा!

पोलीस अंमलदार दत्ता चव्हाण यांचा पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- राजुरा पोलीस स्टेशन येथे पोलीस अंमलदार म्हणून कार्यरत असलेले दत्ता बालू चव्हाण यांनी पर्यावरण संवर्धनासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. स्वतः पासून आणि स्वतःचा परिवारा सोबतच आपल्या कार्यक्षेत्रातही दत्ता चव्हाण वेगवेगळ्या प्रसंगी वृक्षारोपण करीत असतात. अत्यंत धावपळीच्या व व्यस्त कार्यक्षेत्रातही ते पर्यावरण संवर्धनाचा ध्यास जपतात. नुकताच त्यांच्या मुलाचा प्रियांशु चा तिसरा वाढदिवस होता.

तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधत आंबा, फणस, बदाम या फळझाडांचे वृक्षारोपण त्यांनी केले. कामाचे क्षेत्र असो की घराजवळील परिसर चव्हाण यांनी वृक्षारोपनाचा ध्यास जपला आहे. त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून बालवयातच आपल्या मुलाचा वाढदिवस वृक्षांच्या सानिध्यात साजरा करून त्याला वृक्षांचे महत्व पटवून दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये