ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कै.अण्णाभाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे स्वागत करून शाळेत प्रवेश 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती:- तालुक्यातील कुंभेझरी येथील कै.अण्णाभाऊ साठे उच्च माध्यमिक विद्यालयात वर्ग ५ ते १२ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन शाळेच्या गेटवरच शाळेचे प्राचार्य पाचभाई,प्रा. गांजरे, प्रा. वावरे, प्रा. मालेकर, प्रा.जीवतोडे, प्रा. गोतावळे, लोडे,वाघमारे, जीवने, पेंदोर,भगत,डवरे,अहिरकर, सौ. नंदनवार,बूचे, मोतेवाड,नामवाड बोरीकर इत्यादी कर्मचारी उपस्थित होते. त्यावेळी सर्व शिक्षक वृंद यांनी विद्यार्थ्यांना चॉकलेट व पुष्पगुच्छ देऊन शाळेत स्वागत करून त्यांचा प्रवेश निश्चित केला. अश्या आनंददायी वातावरणात विद्यार्थ्यांचा आज पहिला दिवस घेण्यात आला यावेळी वाघमारे व वावरे यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतील वर्ग ५ ते ८ विद्यार्थ्यांना पेन, पुस्तके, व कंपास व इतर साहित्य त्यांना भेट देण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाचे संचालन वाघमारे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गांजरे यांनी केले व अध्यक्ष भाषण पाचभाई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी कसे जगावे कसे वागावे व आयुष्य घडविण्यासाठी संस्कारित राहावे. याकरिता सर्व विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत यावे असे विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. यावेळी ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींचे सुद्धा त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून त्यांचे शाळेत नव्याने प्रवेश निश्चित केला आहे. या कार्यक्रमाची सांगता देशभक्तीपर गीताने करण्यात आली. आज पहिलाच दिवशी शाळेत मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनीची मोठी उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये