गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

१६ लाख २९ हजार ३०१ रूचा ऑनलाईन इंव्हेस्टमेंट फॉडचा गुन्हा दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सायबर पोलीस स्टेशन वर्धा येथे आज दिनांक 30.06.2024 रोजी प्राप्त तक्रारीवरून 16,20,301/- रू चा ऑनलाईन इंव्हेस्टमेंट फॉडचा गुन्हा अप. क. 31/2024 कलम 419, 420 भादवि सहकलम 66ड माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये दाखल करण्यात आला.

गुन्हयाची हकिकत या प्रमाणे आहे की, यातील फिर्यादी – यांना दिनांक 30.03.2024 रोजी अज्ञात मोबाईल क्रमांक 8114508934 यावरून व्हॉट्सअॅपवर शेयर मार्केट इन्व्हेस्टमेंट संबंधाने प्रमोशनल मॅसेज आला व त्यावर रिप्लाय केला असता त्यांना The vanuguard group investment club 310 या व्हॉटसअॅप गृपला अॅड करण्यात आले. सदर गृपवर शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत प्रेरीत करून वेगवेगळ्या बॅक अकाउंटवर पैसे जमा करण्यास सांगून सदर रक्कम शेयर मार्केटमध्ये गुंतविण्यात येत असल्याबाबत https://www.zcxmvni.com या पोर्टलद्वारे दाखविण्यात येत होते. सदर पोर्टलमध्ये प्रथम 17.04.2024 रोजी 50,000/- रूची गुंतवणूक केल्यानंतर त्या रक्कमेमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने फिर्यादी यांनी दिनांक 17.04.2024 ते दिनांक 18.06.2024 पावेतो वेळावेळी एकूण 16,20,301/- रूची रक्कम आरोपींनी व्हॉटस्अॅपवर दिलेल्या वेगवेगळ्या अकाउंटमध्ये भरली. सदर रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता रक्कम विड्रॉल होत नसल्याने त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने दिनांक 24.06.2024 रोजी नॅशनल सायबर काईम पोर्टल 1930 वर तकार करून आज रोजी सायबर पो.स्टे. येथे वर नमूद प्रमाणे गुन्हा दाखल केला असून गुन्हयाचा पुढील तपास सुरू आहे.

गुन्हयाची पध्दत

• आरोपी हे व्हॉट्सअॅप / टेलीग्रामचे माध्यमातून गृपद्वारे / खाजगी मॅसेजवर नागरीकांशी संपर्क करतात.

• त्या गृपमधील आरोपींचेच लोक त्यांना शेयर मार्केट गुंतवणूकीतून खूप फायदा मिळत आहे असे दाखवून नागरीकांना प्रलोभीत करतात.

• आरोपी हे नागरीकांना प्रथम फी डेमो देतात त्यानंतर छोटी गुंतवणूक करण्यात सांगून काही मोबदला देतात, त्यांची कपंनी सेबी रजीस्टर असल्याचे खोटे प्रमाणपत्र दाखवून नागरीकांचा विश्वास संपादन करतात.

https://www.zcxmvni.com या प्रकारच्या वेबसाईट या ख-या शेयर मार्केटच्या डाटा सोबत लिंक असलेले पोर्टल त्यांना वापण्यासाठी देतात.

• आरोपी हे नागरीकांकडून प्राप्त रक्कम ही स्वतः वापरतात किंवा त्यांच्या डीमॅट अकाउंटमधून शेयर मार्केटमध्ये गुंतवितात त्यामूळे नागरीकाना यांची कोणताही मोबदला मिळत नाही.

• नागरीक पैसे विड्रॉल करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा या ना त्या कारणाने आरोपी त्यांची रक्कम अडवून ठेवतात.

• अशा गुन्हयांमधील मोबाईल नंबर व बँक अकाउंट हे आरोपी गैरमार्गांनी संपादीत करीत असून त्यांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर करतात.

वर्धा जिल्हयातील प्रकरणे.

वर्धा सायबर पो.स्टे.ला 2024 मध्ये ऑनलाईन इन्व्हेस्टमेंटचे एकूण 9 गुन्हे दाखल असून त्यामध्ये नागरीकांचे 1 लाख ते 16 लाख एवढ्या रक्कमेची फसवणूक झाली आहे. तसेच नॅशनल सायबर काईम रिपोर्टीग पोर्टल 1930 वर अनेक तकारी चौकशीमध्ये आहेत.

नागरीकांना आव्हान

शेयर मार्केट गुंतवणूक ही डी-मॅट अकाउंटवरून योग्य कंपन्यांकडूनच करावी. व्हॉट्सअॅप / टेलीग्रामवर येणा-या अनोळखी इसमांचे भूलथापांना बळी पडू नये.

आपली रक्कम कोणत्याही कंपनीच्या / इंटरप्रायझेसच्या अकाउंटवर टाकू नये.

अनोळखी व्यक्तींना थोड्या जास्त नफ्याचे लोभापायी आपली बँकेची अथवा आधार पॅनकार्डची माहिती शेयर करू नये.

• असे प्रकारचे कोणतेही गैरप्रकार निदर्शनास आल्यास जवळील सायबर सेलला त्यासंबंधाने रिपोर्ट करावा अथवा वर्धा सायबर सेल कमांक 07152-240723 यावर माहिती द्यावी.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये