Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

विश्वशांती विद्यालयात मासा कन्नमवार जयंती उत्साहात साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्वशांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे महाराष्ट्राचे दुसरे व विदर्भाचे पहिले मुख्यमंत्री मासा.उर्फ दादासाहेब कन्नमवार यांची १२५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.सर्वप्रथम मासा. कन्नमवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मुप्पावार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे पर्यवेक्षक मधुकर जाधव,ज्येष्ठ शिक्षक संजय ढवस,धर्मेंद्र दुधे,किशोर संगिडवार श्वेता खर्चे उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उच्च माध्यमिक शिक्षक धनंजय गुरनुले आणि राजू केदार यांनी दादासाहेब कन्नमवार यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका वनिता गेडाम यांनी मानले तर आभार महेश देहारकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाचे शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी वर्गांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये