ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व समावेशक प्रगतीपथावर नेणारा – माजी आमदार अँड संजय धोटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

  राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशन २०२४-२५चा अंतरिम अर्थसंकल्प विधानसभेत मा. अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केला.

अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने सर्वसमावेशक असून सर्व समाजघटकांच्या विकासाला चालना देण्यासाठी भरीव आर्थिक तरतूद त्यात आहे. अर्थसंकल्पात राज्यातील उच्चशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थींना मोफत शिक्षणाचे द्वार उघडे करून महायुती सरकारने त्यांच्या पंखांना स्वप्नपूर्तीचे बळ दिले आहे.

शेतकरी, आदिवासी, महिला, इतर मागास वर्गाला या अर्थसंकल्पातून न्याय देण्याचा करण्यात आलेला प्रयत्न विशेष उल्लेखनीय आहे.

आज सादर झालेल्या अर्थसंकल्पाबद्दल, हा राज्याला विकासाकडे, प्रगतीकडे नेणारा अर्थसंकल्प आहे असे निश्चितच म्हणता येईल. हा अर्थसंकल्प सर्व समावेशक असुन महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा आहे यातुन महाराष्ट्र समुध्द प्रगतशील राज्य बनवणार असे मत माजी आमदार अँड संजयजी धोटे यांनी व्यक्त केले.

राज्यातील सर्व घटकांचा विकास साधत महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्याचा संकल्प करणारा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सादर केलेला असून महायुती सरकारने या माध्यमातून शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक अशा सर्वच घटकांचे हित साधले आणि सर्वागीण विकासासाठी असल्याचे मत व्यक्त केले आहे.

यात माझी लाडकी बहीण योजना ही अतिशय महत्वाची योजना महायुती सरकारने घोषित केली आहे. कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध योजना व भरीव तरतुदी जाहीर करत महायुती सरकारने बळीराजाला दिलासा व आधार दिला आहे. दिव्यांगांसाठी आनंद दिघे योजना , शेळी मेंढी, कुकूटपालनासाठी प्रोत्साहन देणारी योजना, नमो शेतकरी महासन्मान निधी, आवास योजनेच्या माध्यमातून 35 लाखाहून अधिक घरे बांधण्याचा संकल्प अशा महत्वपूर्ण योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्र समृद्ध व प्रगतीशील राज्य बनविण्यासाठी अर्थमंत्री अजितदादा यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे जनता निश्चितपणे स्वागत करेल असा विश्वास आहे.

महाराष्ट्र सरकारचे मनपुर्वक अभिनंदन।।

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये