ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर जालना जवळ दोन कारचा भीषण अपघात

7 ठार - 4 जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

समृध्दी महामार्गावर जालना जवळ दोन कारचा भीषण अपघात होऊन 7ठार व 4जखमी झाल्याची घटना 28जून ला रात्री. 11च्या दरम्यान घडली.

प्राप्त माहितीनुसार एम एच ४७ बि पी ५४७८ क्रमांकाची इर्टिका कार नागपूर वरून मुंबईकडे जात होती. रात्री अकराच्या सुमारास एम एच १२, एम एफ १८५६ क्रमांकाची स्विफ्ट कार कडवंची गावाजवळील पेट्रोल पंपावरून डिझेल भरून विरुद्ध दिशेने येत होती. विरुद्ध दिशेने अचानक कार आल्याने इर्टिका आणि स्विफ्ट ची जोराची धडक झाली. या अपघातानंतर दोन्ही वाहनांचा अक्षरशः चुराडा झाला. दोन्ही वाहने बॅरिकेट्स तोडून रस्त्याच्या खाली गेली. या अपघातात स्विफ्ट कारमधील चौघांचा आणि इर्टिका वाहनातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. अन्य ४ जण गंभीर जखमी झाले आहेत, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

नियम मोडला आणि घात झाला.

समृद्धी महामार्गावर विरुद्ध दिशेने वाहने येत नाहीत. नागपूरकडे जाण्यासाठी आणि मुंबईकडे जाण्यासाठी दोन वेगवेगळ्या लेन आहेत. मात्र पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी स्विफ्ट कार दुसऱ्या लेन वर गेली. तिथून परत येताना मुंबई कडे जाणाऱ्या रस्त्यावरून विरुद्ध दिशेने धावली, त्यामुळेच हा अपघात झाल स्विफ्ट कारचालकाची चुकी ७ जणांच्या जीवावर बेतली.

 देऊळगाव राजा तालुक्यातील चौघांचा अपघातात मृत्यू

 या अपघातात स्विफ्ट डिझायर मधील चौघाचा जागीच मृत्यू झाला बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील विलास कायंदे वय 28 वर्ष राहणार उंबरखेड, संदीप बुधवत वय 28 राहणार उंबरखेड तालुका देऊळगाव राजा, प्रदीप मिसाळ वय 30 वर्षे पिंपळगाव बुद्रुक, आणि अनिकेत चव्हाण वय 30 वर्ष राहणार देऊळगाव राजा सर्व देऊळगाव राजा तालुका असे मृतकांची नावे समोर आली आहेत दोघेही फिरायला जात आहे असे सांगून घरून निघाल्याचे सांगण्यात येत आहे

अपघाताची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक आर के निकम, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक साळुंके, हेड कॉन्स्टेबल मिसाळ, हार्जित राठोड, रवि पवार तात्काळ घटनास्थळी पोहोचले व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले, कार मध्ये फसलेल्या मृतकाना कटर च्या साहाय्याने दरवाजे तोडून बाहेर काढले, अपघातस्थळी छत्रपती संभाजी नगर महामार्ग परिक्षेत्र चे पोलिस निरीक्षक गिरी, पोलिस निरीक्षक उनवणे, परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन मयत व्यक्तीच्या व जखमी च्या नातेवाईकांना अपघाताची माहिती फोन द्वारे देऊन वाहतूक सुरळीत सुरु केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये