ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चक्रिय अर्थव्यवस्था नागरी चळवळ झाली पाहिजे – कॅप्टन मोहन गुजरकर

'चक्रिय अर्थव्यवस्थे'वर वेबीनार संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

देवळी : ‘बदलते हवामान, पर्यावरणाचा ढासळता समतोल, नैसर्गिक संसाधनाचा मर्यादित साठा, वाढती लोकसंख्या व उद्योगांचा विस्तार या पाच घटकांचा विचार केल्यास पर्यावरणपूरक जीवन जगायचे असेल तर ‘चक्रिय अर्थव्यवस्था स्विकार केली पाहिजे. या दृष्टिकोनातून जगभरात विकसित देशांनी चक्रिय अर्थव्यवस्थेवर भर दिलेला आहे. म्हणूनच आपल्याही देशात हि चक्रिय अर्थव्यवस्था नागरी चळवळ झाली पाहिजे, असे प्रतिपादन स्थानिक एस.एस.एन.जे. महाविद्यालयातील एन.सी.सी. युनिट तर्फे आयोजित विशेष व्याख्यानात एन.सी.सी. ऑफिसर कॅप्टन मोहन गुजरकर यांनी 28 जून रोजी महाविद्यालयाच्या एन.सी.सी. सभागृहात केले.

राष्ट्रीय छात्र सेनेच्या महाराष्ट्र डायरेक्टोरेट तर्फे 21 महाराष्ट्र एन.सी.सी.बटालियन अंतर्गत स्थानिक एस.एस.एन.जे. महाविद्यालयात छात्र सैनिकांकरीता ‘चक्रिय अर्थव्यवस्था – सात आर चा स्विकार’ या विषयावर कॅप्टन प्रा.मोहन गुजरकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. एन.सी.सी. बटालियनचे कमाडंट कर्नल समिक घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सदर वेबीनार आयोजित करण्यात आला होता.
यात कॅडेट साक्षी येळणे, रसीका बनकर, कांचन राऊत, खुशी पचारे, मयुरी पेटकर, सुप्रिया यादव, रितेश बुटे, श्रद्धा मडकाम व कोमल शितळे यांनी सदर वेबीनार मध्ये प्रश्न विचारून आपला सहभाग नोंदविला.

कॅप्टन गुजरकर आपल्या मार्गदर्शनात म्हणाले आज जगभरात नैसर्गिक संसाधने मर्यादित उरलेले असून आपली पिढी व येणाऱ्या भावी पिढ्यांकरीता नैसर्गिक संसाधने टिकवण्याकरीता चक्रिय अर्थव्यवस्थेला स्विकारले पाहिजे. यात ‘सात आर’ म्हणजे – रिथींक, रियुज, रिडयूस, रिसायकल, रिपेअर, रिफरबिश व रिकव्हर होय. म्हणजेच काहीही करायच्या आधी ‘पुनर्विचार करणे’, ‘पुन्हा-पुन्हा ती वस्तू वापरणे’, ‘आपल्या गरजा मर्यादित करणे’, ‘वापरलेल्या वस्तूंचा वापर करून पुन्हा तयार करणे ‘, ‘ दुरुस्त करून पुन्हा वापरणे’, ‘वापरलेल्या संसाधनाचा वापर करून वस्तू पुन्हा तयार करणे’ व ‘मर्यादा संपलेल्या वस्तूंना पुनर्जीवन देणे’ या तत्त्वांचा वापर करून ‘चक्रिय अर्थव्यवस्था’ निर्माण करता येते व आज ओढावत असलेल्या समस्यांना सहज सोडवता येतात.

सदर वेबीनार च्या संचालनाकरीता सार्जंट आदित्य तामगाडगे, मनोज नेहारे, अभिषेक नेहारे व एन.सी.सी.छात्र सैनिकांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये