ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सोंडो येथील भाजप, कॉग्रेस व राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा शेतकरी संघटनेत प्रवेश

ॲड.वामनराव चटप यांनी लाल बिल्ला लावून केले स्वागत

चांदा ब्लास्ट

राजुरा तालुक्यातील सोंडो या गावी कॉग्रेस, भाजप व राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या सुमारे पन्नास कार्यकर्त्यांनी आपल्या पक्षाला रामराम करीत ॲड.वामनराव चटप यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत शेतकरी संघटनेत प्रवेश केला. यावेळी शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून आणि पुष्पगुच्छ देऊन या कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते ॲड.वामनराव चटप, शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख शेषराव बोंडे, कपिल इद्दे, बाजार समितीचे माजी सभापती प्रभाकर ढवस, बाजार समिती संचालक दिलीप देठे, माजी नगरसेवक मधुकर चिंचोळकर, भाऊजी कन्नाके,आबाजी धानोरकर, घनश्याम पिंपळशेंडे,सतय्या रामगिरवार,मारोती लोहे,सतीश लोहे आणि मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

                    यावेळी बोलतांना ॲड.वामनराव म्हणाले की, शेतक-यांपुढे अनेक ज्वलंत समस्या असून केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना न्याय देत नाही. शेतकरी विरोधी धोरणे राबवून सतत शेतक-यांवर अन्याय करते. सत्तारूढ नेतेही या विषयावर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात असमर्थ ठरत आहेत. म्हणून आता आपल्या प्रश्नाबाबत शेतकऱ्यांनीच पुढे येऊन संघर्ष करीत समस्या मांडूून वाचा फोडली पाहिज, असे मत ॲड.वामनराव चटप यांनी मांडले.

                 या कार्यक्रमात सोंडो येथील भाजप, कॉग्रेस व राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. त्यात श्रीनिवास मिसलवार,जगदीश गड्डमवार,गणपत निकुरे,कुलदीप वांढरे,अभिषेक सुर्यवंशी,रोशन गेडाम, गणपत वांढरे,मयुर उमरे,अमरदिप वांढरे,संतोष वडस्कर,मारोती मिसलवार,सत्यपाल खोब्रागडे, दादाजी उमरे, गोपाल बोल्लुवार, बळीराम चांदेकर,शामराव गोलावार,सत्यपाल मालेकर, महेश उपरे,भिमराव इप्परवार,शामराव इप्परवार,सत्यपाल वडस्कर, श्रीनिवास ताडेवार,संदिप नळे, भिमराव कन्नाके,सुधाकर वडस्कर, लटारू कौरासे,नानाजी आदे,उमेश दुर्गे,गुणवंत बरडे,ज्ञानु चौधरी, नागोराव उमरे,रमेश इप्परवार,विठ्ठल जिलपेलवार,भाऊजी वडस्कर,रामु कटरी,सुरेश येमेवार,प्रविण येनबिलवार,करण चांदेकर,किशन झाडे,शामराव गोलावार यांचेसह अनेक कार्यकर्त्यांचा समावेश आहे. या कार्यकर्त्यांचे गावात स्वागत करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये