Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इंद्रधनुष्य सांस्कृतिक महोत्सवमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाचे सुयश

राज्यस्तरीय इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी महाविद्यालयातील 10 विद्यार्थ्यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

गोंडवाना विद्यापीठाच्या वतीने आंतर महाविद्यालयीन तीन दिवसीय इंद्रधनुष्य कला व सांस्कृतिक महोत्सव पार पडला यामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयाने विविध स्पर्धेत सहभाग घेऊन कलाविष्कार केला एकांकिका या स्पर्धमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला यामध्ये शिवानी भोयर, वैष्णवी अलाम, सुरेंद्र ठाकरे, किशोर बोरकुटे, गोपीचंद निकोडे,रोहित कोसरे,अभी दरडे हे विद्यार्थी सहभागी होते. तसेच लोकनृत्य या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. यामध्ये प्रणाली वरखेडे, नंदनी बोधनवार, पूजा चौधरी, तन्वी वाकुडकर, कित्ति शेडमाके, ज्ञानेश्वरी चौधरी, प्रणिता चौधरी, तृप्ती तीवाडे, दुषवंता चुडेवार, आदित्य दराडे सहभागी होते प्रश्नमंजुषा या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला.

यामध्ये निधी शेंडे, प्रियांशू गंडाटे, साहिल बरेवार सहभागी होते एकांकिका प्रकारांमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त करत राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयांने आपली विजयी मोहोर उमटवली लोकनृत्य, आणि प्रश्नमंजुषाया स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त केला. राज्यस्तरीय इंद्रधनुष्य स्पर्धेसाठी महाविद्यालयातील 10 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.

एकांकिका आणि लोकनृत्य प्रशिक्षक म्हणून अंतबोध बोरकर यांचे सहकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक खोबरागडे यांचे मार्गदर्शन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.स्मिता राऊत,डॉ. किरण कापगते, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. रामचंद्र वासेकर, विद्यार्थी कल्याण विभागाचे डॉ. प्रफुल वैराळे यांच्या समन्वयन विद्यार्थीच्या कलागुणांनी या आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव मध्ये सुयश प्राप्त करुन विजयी मोहोर उमटवली. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष संदीपभाऊ गड्डमवार, उपाध्यक्ष अनिलजी स्वामी, सचिव राजाबाळ पाटील संगीडवार यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये