ताज्या घडामोडी

वसतिगृहात विद्यार्थी मृत्यु प्रकर्णी दोन वसतिगृह संचालकास 02 वर्ष कारावास व प्रत्येकी 1000 रु. दंडाची शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

दि.08 मार्च 2014 रोजी फिर्यादी राजु रंगनाथ डोंगरे वय 30 वर्षे, रा. बाजीउम्रद ता.जि. जालना यांनी पोलीस स्टेशन देउळगांव राजा येथे रीपोर्ट दिला की, फिर्यादीचा मुलगा मृतक अक्षय राजु डॉगरे वय 10 वर्षे, रा. बाजीउम्रद ता.जि. जालना हा सिध्दीनिकेतन वस्तीगृहामध्ये राहण्यास होता व आरोपी रामप्रसाद नामदेव नागरे व गजानन नागोराव आघाव दोन्ही रा. देउळगांव राजा हे वस्तीगृहाचे संचालक असुन फिर्यादीचा मुलगा आजारी असतांना त्यास वैद्यकीय उपचार करणे गरजेचे असतांना यातील आरोपीनी वैद्यकीय उपचार केले नाही. व त्यांचे कर्तव्यात निष्काळजीपणा व बेजबाबदार पणा करुन मृतक अक्षय राजु डोंगरे यास वैद्यकीय औषधोपचार पुरविले नाही, त्यामुळे तो मरण पावला.

यावरुन पोलीस स्टेशन देउळगांव राजा येथे आरोपीतां विरुध्द अपराध क्र.20/2014 क. 304 (अ) भा.दं.वि. प्रमाणे गुन्हा दाखल करुन तपास अधिकारी सपोनी किशोर जुनघरे यांनी सदर गुन्हयाचा तपास पूर्ण करुन आरोपी विरुध्द मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी, कोर्ट देउळगांव राजा येथे दोषारोप पत्र दाखल केले. सदर गुन्हयामध्ये वि. न्यायालयाने एकुण 05 साक्षीदार तपासले. आरोपीतां विरुध्द कलम 304 (अ) भा.दं.वि. प्रमाणे सबळ पुरावा उपलब्द झाल्याने न्यायाधीश श्री. शैलेश कंठे, प्रथम वर्ग न्यायदंडाधीकारी कोर्ट-01 ले, देउळगांव राजा यांनी दोन्ही आरोपीतांना 02 वर्षे कारावासाची शिक्षा व प्रत्येकी 1000 रु. दंड ठोठावला आहे.

सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता अनिल शेळके यांनी तर कोर्ट पैरवी म्हणुन पो.नि. संतोष महल्ले ठाणेदार देउळगांव राजा यांच्या मार्गदर्शनाखाली महीला नापोकों जयश्री काकडे यांनी काम पाहीले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये