ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विरंगुळा सेंटरचा नावाने वॉल कंपाऊंड बांधकाम करिता करोडो रुपये खर्च – बल्लारपूर नगर परिषद 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

बल्लारपूर – मागील दोन तीन वर्षा पासून नगरपारिषद ची निवडणूक होत नसल्याने कोणतेही नगरसेवक व नगराध्यक्ष नसल्याने नगरपरिषद चे कारभार प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्यधिकारी च पाहतात छोटे मोठे निर्णय घ्यायचे असल्यास एकतर्फी निर्णय घेऊन पास करतात, शहरातील जनतेची समस्या जशीचा तशीच राहतात.

आवास योजना मध्ये घरकुल मिळणार म्हणून काही अर्जदारांनी आपले घर अर्धवट खोलून मोकळ्यावर राहतं आहे घरकुलची निधीच आली नाही म्हणून सांगतात.नगरपरिषद चे निवृत्त झालेले कर्मचारी यांचे निवृत्त निधी आतापर्यंत पूर्ण देण्यात आली नाही, पेन्शन 50%विक्री चे पैसे निवेदन देऊन ही निधी देण्यात आली नाही. निवृत्त झालेले कर्मचारी यांचे पैसे नगर परिषद वर बाकी (जमा)असताना. कंत्राटदार ला विशेष लाभ देण्याकरिता वैशिष्ट्यपूर्ण विशेष निधी अंतर्गत विरंगुळा सेंटर चा नावाने कंपाउंड वॉल बांधकाम चे कंत्राट अंदाजित की 1करोड 27लाख 46हजार 380रुपये चे देण्यात आले.हे कामं कंत्राटदार सर्वे नियम व अटी डावलून बांधकाम करीत आहे.

कार्य स्थळवर नियमाने प्रस्थावीत कामाचे शासनाने विहित केलेल्या आकाराची माहितीचा तपशील दर्शविणारा फलक बोर्ड कार्य स्थळ वर लावणे बंधनकारक आहे तसें नगर परिषद व कंत्राटदार ने केले नाही.बांधकाम नियम व अटी प्रमाणे होताना दिसत नाही या कामात घोळ आहे असे नागरिक म्हणत आहे हे कार्य दादाभाई नौरोजी वॉर्ड मधील दादाभाई पोटरीज चा जागेवर सार्वजनिक बांधकाम विभाग (PwD)मार्फत स्व, सुषमा स्वराज महिला समिक्षकरण भवन 13करोड रुपये खर्च करून बनत आहे त्याच ठिकाणी नगर परिषद बल्लारपूरने विरंगुळा सेंटरचा नावाने वॉल कंपाऊंड करोडो रुपये खर्च करून बनवत आहे  वॉल कंपाऊंड ला करोडो रुपये खर्च होतात काय असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. कोणतेही नगरसेवक व नगराध्यक्ष नसल्याने स्वतःचेच निर्णय घेऊन आलेली निधीचा गैरवापर होत असल्याची कून कून शहरातील जनता करीत आहे.या कामाची चौकशी होने गरजेचे आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये