ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अन्नदाता एकता मंचाच्या मागणीला यश

शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा नुकसान भरपाई येण्यास सुरुवात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          सण २०२३-२४ मध्ये राज्य सरकारने १ रुपयात पिक विमा योजना सुरू केली,मात्र नुकसान होऊन सुद्धा चंद्रपूर जिल्ह्यातील Orient insurance company ने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर नुकसान भरपाई देण्यास टाळाटाळ करत होती,मात्र अन्नदाता एकता मंचचे मार्गदर्शक डॉ चेतन खुटेमाटे यांच्या मार्गदर्शनात अध्यक्ष संदिप कुटेमाटे,संस्थापक अनुप कुटेमाटे,मोहन दवे,प्रदीप डोंगे,प्रवीण आवारी,विनोद ठोंबरे,सुनील मोरे,अमोल क्षीरसागर आणि असंख्य शेतकऱ्यांनी यांचा जिल्हाधिकारी ,जिल्हा कृषी अधीक्षक व तालुका कृषी अधिकारी भद्रावती यांना निवेदन दिले.त्यानंतर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झाली मात्र ती कमी असल्यामुळे त्याचा पाठपुरवठा करण्यात आला.आणि त्यानंतर सुद्धा पीकविमा कंपनीकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच अन्नदाता एकता मंचचे संस्थापक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ट्विट केले यांची दखल वृत्तपत्रांनी घेतली.२२ जून रोजी पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांनी नियोजन भवन येथे पीकविमा संबंधित कृषी विभाग व पीकविमा संबंधित बैठक घेतली होती.

अन्नदाता एकता मंचचा पाठपूरवठा , वृत्तपत्रांनी दिलेली साथ आणि कृषी विभागाचे सहकार्य यांच्या सहकार्याने यश मिळाले.२०२२-२३ मध्ये सुद्धा अन्नदाता एकता मंचच्या पाठपूरवठा आणि आंदोलनाला यश मिळाले होते आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली होती.संपूर्ण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विकविमा भरपाई मिळत पर्यंत हा लढा सुरू राहणार आहे.

जे राजकीय पुढाऱ्यांना जमत नाही ते शेतकरी पुत्रांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या अन्नदाता एकता मंच करत असल्याची चर्चा सर्वत्र होत आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये