Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

माजी जि प विरोधी पक्ष नेते मनोज कायंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व मनोज देवानंद कायंदे, महासचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस तथा मा.विरोधी पक्षनेते जि प बुलढाणा यांच्या वाढदिवसाच्या निमित्त भव्य मॅरेथॉन स्पर्धा 2024 रविवारी संपन्न झाली.

युवकांमध्ये दैनंदिन जीवनामध्ये सुदृढ व निरोगी राहण्यासाठी व्यायाम, उत्तम आहार व निर्व्यसनी राहणे खूप गरजेचे असते. या सर्व गोष्टींची जनजागृती व्हावी यासाठी या भव्य स्पेर्धेचे मॅरेथॉन चे आयोजन करण्यात आलेले होते.

या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदवून आपल्या धावण्याच्या कौशल्याचे प्रदर्शन केले या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक रोहित वैद्य ,जालना द्वितीय क्रमांक गणेश बाम्हणे ,जालना तर तृतीय क्रमांक गौरव भराड ,चिखली यांनी पटकावला तर प्रथम 50 स्पर्धकांना आकर्षक टी-शर्ट चे वाटप करण्यात आले व स्पर्धेमध्ये सहभागी सर्व स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणारे पोलीस विभागाचे सर्व कर्मचारी आरोग्य विभागाचे कर्मचारी व पत्रकार बांधवांचे आयोजकांनी विशेष आभार मानले तसेच पंच म्हणून नंदू सोसे सर कमांडो चेके सर भीमराव चाटे मा.सैनिक यांचे ही आभार व्यक्त करण्यात आले.

बक्षीस वितरण समारंभासाठी काँग्रेस चे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन लंगोटे डॉ.अशोक काबरा, हाजी सिद्धी शेठ, सुभाष दराडे, लक्ष्मण कव्हळे,गणेश डोईफोडे,प्रा सपाटे सर ,वाडेकर सर, प्रा. अशोक डोईफोडे,सुनील खांडेभराड,राजू नाडे ,सुखदेव शिरसाठ ,यश कासारे ,राहुल धाटे, रईस सर, मुन्ना ठाकुर,सत्यनारायण पावले, भीमराव काकडे ,गणेश आडे, निखिल जायभाये ,मदन आघाव, सय्यद इजाज,मोहम्मद शेख, दीपक चेके ,ऋषिकेश आंधळे, संजय जायभाये,गोपाल शेळके, सचिन मुंडे, संतोष काकड ,गणेश मुंडे ,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गजानन काकड शहराध्यक्ष विष्णू झोरे, प्रा.दिलीप सानप,हनीफ शहा,गजानन तिडके,नझिम भाई यांनी प्रयत्न केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये