Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदे भरणे साठी मैदानी चाचणी परीक्षा

भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरिता एकूण ४३१ अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त

चांदा ब्लास्ट

वर्धा जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदे भरणे साठी मैदानी चाचणी परीक्षा आज दिनांक २२/०६/२०२४ ला सकाळी ०५.०० वाजे पासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू झाली. जिल्यात पोलीस शिपाई पदाकरिता एकूण २० पद भरावयाचे आहे त्याकरिता एकूण २०९१ फॉर्म प्राप्त झाले असून यात पुरुष उमेदवार १७५६, महिला उमेदवार ३४४ तसेच ०१ तृतीय पंथी उमेदवार यांचा समावेश आहे त्यापैकी आज दिनांक २२-०६-२०२४ एकूण 368 उमेदवारांना शारीरिक चाचणी करिता बोलाविण्यात आले होते, यात ३३६ महिला १८ पूर्व सैनिक आणि १३ तारीख बदलवून देण्यात आलेले उमेदवार होते त्यापैकी १९९ महिला उमेदवारांनी तसेच १४ पूर्व सैनिक आणि २२ पुरुष अशा एकूण २३५ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.

शारीरिक चाचणीत उंच उडी, गोळा फेक, १०० मीटर ८०० मीटर, १६०० मीटर धावणे याचा समावेश करण्यात आला आहे.

भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरिता एकूण ४३१ अधिकारी व कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. मैदानी चाचणी सलग ४ दिवस घेण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये