Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नगर परिषदेच्या वतीने श्री शिवाजी हायस्कूल येथे योग दिन साजरा

तालुक्यात विविध ठिकाणी योग दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा तालुक्यात दिनांक 21 जून रोजी जागतिक योग दिन विविध ठिकाणी साजरा करण्यात आला नगरपरिषद देऊळगांवगा राजाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल येथील प्रांगणामध्ये मुख्याधिकारी तथा प्रशासक अरुण मोकळ यांच्या आव्हानावर विद्यार्थी शिक्षक प्रशासकीय अधिकारी कर्मचारी ,पत्रकार ,नगर परिषदेचे कर्मचारी व शिक्षक वृंद आणि नागरिकांनी योगासने करून जागतिक योग दिन साजरा केला याप्रसंगी मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या हस्ते शिवाजी हायस्कूलच्या प्रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले .

        देऊळगाव राजा नगर परिषदेच्या वतीने दिनांक 21 जून रोजी श्री शिवाजी हायस्कूल येथील प्रांगणामध्ये प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी जागतिक योग दिन कार्यक्रमाचे आयोजन केले होते .याप्रसंगी नागरिकांना योगा करण्यासाठी मुख्याधिकारी यांनी आवाहन केले त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत विविध क्षेत्रातील मान्यवरांसह शिक्षक विद्यार्थी पालक पत्रकार कर्मचारी यांनी सहभाग घेतला शिवाजी हायस्कूलचे शिक्षक तायडे सर व देऊळगावराजा हायस्कूलचे शिक्षक मुळे सर यांनी उपस्थित नागरिककडून प्राणायाम व योगासने करून घेतली.कार्यक्रम संपल्यानंतर मुख्याधिकारी अरुण मोकळ यांच्या हस्ते शिवाजी हायस्कूल येथील रांगणामध्ये वृक्षारोपण करण्यात आले.जागतिक योग दिन प्रसंगी मुख्याधिकारी अरुण मोकळ गटविकास अधिकारी मुकेश माहोर,सहाय्यक गटशिक्षणाधिकारी प्रवीण सपाटे, गटशिक्षणाधिकारी मुसदवाले,नगर परिषदेचे अधिकारी जाधव, मुंडे, नागवे ‘ नजीर भाई , इंजिनीयर वृंद,शिंगणे मॅडम,शिवाजी हायस्कूलचे प्राचार्य संजय देशमुख पर्यवेक्षक राजेंद्र सपाटे,आदींची उपस्थिती होती.

      शहरामध्ये राजस्थानी भवन येथे,भारतीय जनता पार्टी, आर्ट ऑफ लिविंग, पतंजली, जायंटस ग्रुप, राजस्थानी महिला मंडळ, आदींच्या संयुक्त विद्यमाने योग दिन साजरा करण्यात आला.

तालूका व शहरातील विविध शाळा महाविद्यालय येथे योग दिन साजरा करण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये