ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलिस भरती 2024 करिता आलेल्या गरजू उमेदवार यांचे राहण्याची सोय

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलिस भरती 2024 करिता आवेदन अर्ज केलेल्या उमेदवारांना वर्धा जिल्हा पोलिस कडून कळविण्यात येते, की सदर पोलिस भरती प्रक्रिया ही दिनांक 19/06/2024 पासून सुरू असून ती दिनांक 22/06/2024 रोजी पर्यंत सुरू राहणार आहे.

पोलिस भरती करिता,उमेदवार हे जिल्ह्यातून वेगवेगळ्या ठिकाणाहून तसेच बाहेरील जिल्ह्यातून येत असतात, त्यांना पोलिस भरती करिता असुविधा होऊ नये याकरिता राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून,ज्या उमेदवार यांना राहण्याची व्यवस्था झाली नाही, त्यांची व्यवस्था ही जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पोलिस अधीक्षक कार्यालय चे समोर वर्धा येथे, तसेच राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था ही सेलिब्रेशन हॉल, गर्जना चौक, वर्धा येथे करण्यात आलेली आहे. पोलिस भरती उमेदवार यांना मा. पोलिस अधीक्षक साहेब वर्धा यांनी आवाहन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये