ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदे भरणे साठी मैदानी चाचणी परीक्षा

भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरिता एकूण ४३१ अधिकारी कर्मचारी यांचा बंदोबस्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस दलातील रिक्त पदे भरणे साठी मैदानी चाचणी परीक्षा आज दिनांक १९/०६/२०२४ ला सकाळी ०५.०० वाजे पासून पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू झाली आज दिनांक १९/०६/२०२४ ला ६०० उमेदवारांना शारीरिक चाचणी करिता बोलाविण्यात आले होते, त्यापैकी ३४९ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली, ०२ उमेदवारांना तारीख बदलवून देण्यात आली.

शारीरिक चाचणीत उंच उडी, गोळा फेक, १०० मीटर, ८०० मीटर, १६०० मीटर धावणे यांचा समावेश आहे.

वर्धा जिल्यात पोलीस शिपाई पदाकरिता एकूण २० पद भरावयाचे आहे त्याकरिता एकूण २०९१ फॉर्म प्राप्त झाले असून यात पुरुष १७५६, महिला ३४४ तसेच ०१ तृतीय पंथी यांचा समावेश आहे त्यापैकी आज दिनांक १९/०६/२०२४ ला ६०० उमेदवारांना शारीरिक चाचणी करिता बोलाविण्यात आले होते, त्यापैकी ३४९ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.

भरती प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याकरिता एकूण ४३१ अधिकारी कर्मचारी यांचा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे जिल्यात दिनांक १९,२०,२१, आणि २२ जून २०२४ पर्यंत सदर प्रक्रिया सुरु राहील दरम्यान पाऊस जर जास्त प्रमाणात आला तर उमेदवारांना दुसरी तारीख देण्याबाबत विचार करण्यात येईल तसे त्यांना कळविण्यात येणार आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये