Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा येथील दरोडयाचा गुन्हा उघड ; गुन्हयातील ०९ आरोपी निष्पन्न

एकुण २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      फिर्यादी नामे सौ. भावना राहुल बहाळे, वय ४३ वर्ष, रा. राळेगाव जि. यवतमाळ, ह.मु. बाबाराव राउत यांचे घरी किरायाणे, धुनीवाले मठ चौक, वर्धा हे त्यांचा मुलगा जख्मी नामे सार्थक राहुल बहाळे, वय १६ वर्ष, याचे सह दिनांक ०७/०६/२०२४ रोजी रात्रदरम्याण त्यांचे राहते घरी झोपुन असतांना रात्री अंदाजे ०२/०० वा. दरम्याण त्याचे घराचे मागील गॅलरीचे दरवाज्यातुन घरात प्रवेश करण्याचा आवाज जोरजोराने येत असल्याने ते उठुन बसुन पाहत असता कोणतरी अज्ञात चार ईसम घरात प्रवेश करीत असतांना दिसुन आल्याने यातील फिर्यादी व जख्मी यांनी आरडा ओरड केली असता अज्ञात आरोपीतांनी जख्मी यास लोखंडी रॉडने डोक्यावर मारुन जख्मी करुन फिर्यादीचे गळयातील २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले किंमत ६,०००/-रु, नगदी ३०,०००/-रु असा एकुण ३६,०००/- रु चा माल जबरीने चोरी करुन घेवुन गेला. असे फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट व जख्मीचे मेडीकल रिपोर्ट वरून अज्ञात आरोपीतांन विरुध्द पोलीस स्टेशन वर्धा (शहर) येथे अप. कमांक ८१३/२०२४ कलम ३९४, ३९७, १२० (ब) भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासावर आहे.

सदर गुन्हा हा अत्यंत गंभीर स्वरुपाचा असल्याने सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानीक गुन्हे शाखा, वर्षा तर्फे करीत असतांना घटनास्थळावर मिळालेल्या सि.सि.टी.व्ही फुटेज, तांत्रीक माहीती व स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा येथील अमत पोहवा चंद्रकांत बुरंगे यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे संशयीत आरोपी नामे १) मिथुन नामदेव बव्हाण, वय वर्षे, २) सुभाष नामदेव चव्हाण, वय ४५ वर्षे, दोन्ही रा. मदनी (दिंदोडा) ता. जि. वर्धा, ३) लखन विश्वास मोहीते, वय वर्षे, रा. शिवनगर (देउळगाव) ता. सेलु जि. वर्धा, ४) विनोद मनीलाल जाधव, वय २६ वर्षे, रा. श्रमीकनगर, परसोडी (खापरी) ता.जि. नागपुर यांना दिनांक १२/०६/२०२४ रोजी मौजा परसोडी (खापरी) ता.जि. नागपुर परीसरातुन अत्यंत शिताफीने ताब्यात घेवुन त्यांना गुन्हयाबाबत सखोल विचारपुस केली असता आरोपी नामे मिथुन नामदेव चव्हाण, वय ३४ वर्षे, रा. मदनी (दिंदोडा) ता. जि. वर्धा, याने सांगीतले की, घटनास्थळाचे शेजारी फायनान्सचे दुकान चालवीणारा आरोपी नामे ५) सागर भारतसिंग ठाकुर, वय ४४ वर्षे, रा. वार्ड क. ३, सिध्दी (मेघे), वर्धा याने त्यास फिर्यादी याचे घरी अंदाजे दोन कोटी रुपये (२,००,००,०००/-रु) ठेवुन असल्याची माहीत देवुन त्यास चोरीतील हिस्सा पाहीजे असल्याचे सांगीतले. यावरुन आरोपी मिथुन याने तो मुंबई येथे काम करीत असतांनाचे त्याचे साथीदार नामे ६) रामा रा. भिवंडी, ठाणे यास दिली.

दिनांक २१/०५/२०२४ रोजी वर्धा येथे त्याचा साथीदार नामे रामा व मिश्रा दोन्ही रा. भिवंडी ठाणे हे वर्धा येथे घटनास्थळी येथुन घटनास्थळाची (रेकी) पाहणी व चोरी करण्याचा कट रचुन परत भिवंडी जिल्हा ठाणे येथे गेले व ते त्यांचे साथीदार यांना सदर बाबत माहीती देवुन त्यांचेसह बसने भिवंडी जिल्हा ठाणे येथुन वर्धा येथे दिनांक ०६/०६/२०२४ रोजी सकाळी १०/०० वा. दरम्याण वर्धा येथे येवुन सर्व आरोपी एकत्र भेटुन पुन्हा घटनास्थळाची दुपारी १२/०० वा. दरम्याण पाहणी (रेकी) करुन घटनास्थळाचे शेजारी फावनन्स चे दुकाण असलेला आरोपी सागर भारतसिंग ठाकुर, वय ४४ वर्षे, रा. वार्ड क. ३. सिंध्दी (मेघे), वर्धा याची पुन्हा भेट घेवुन मौजा मदनी (दिंदोडा) ता. जि. वर्धा येथे गेले.

दिनांक ०७/०६/२०२४ चे रात्री ०१/३० वा. दरम्याण घटनास्थळी तिन मोटर सायकलचे मदतीने येवुन फिर्यादीचे घराचे मागील बाजुने घराचे वर चढुन घराचे मागील बाजुस असलेल्या गॅलरीचा दरवाजा तोडुन घरात प्रवेश करुन फिर्यादीचे मुलाने आरडा ओरड केली असता त्यास लोखंडी रॉडने मारुन जख्मी करुन फिर्यादीचे गळयातील २ ग्रॅम वजनाचे सोन्याचे डोरले किंमत ६,०००/-रु व नगदी ३०,०००/-रु असा एकूण ३६,०००/- रु चा माल फिर्यादी व जख्मीस जिवाने ठार मारण्याची धमकी देवुन जबरीने चोरी करुन घेवुन गेले असे तपासात निष्पन्न झाल्याने वरील पाचही आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा ईतर आरोपी रामा व मिश्रा रा. भिवंडी, जिल्हा ठाणे यांचे मदतीने केल्याचे सांगीतल्याने त्यांचा शोध घेणे करीता भिवंडी जिल्हा ठाणे येथे गेलो असता काईम ब्रेन्च युनीट कमांक २ भिवंडी जिल्हा ठाणे यांचे मदतीने सदर आरोपीतांचा शोध घेतला असता आरोपी नामे ६) शिवमंगल उर्फे सागर ईश्वरदीप मिश्रा, वय ४१ वर्ष, रा. बरोचा, पोस्ट बेरोचा, ता. मंजनपुर, जिल्हा कोसंबी राज्य उत्तरप्रदेश ह.मु. पावर हाउस जवळ गुप्ता यांचे घरी किरायाणे भिवंडी जिल्हा ठाणे येथील रेकॉर्ड वरील अट्टल गुन्हेगार असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्यास काईम ब्रेन्च युनीट कमांक २ भिवंडी यांचे मदतीने ट्रॅप लावुन त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्यास गुन्हयासंबंधाने विचारपुस केली असता त्याने सदर गुन्हा हा त्याचे साथीदार नामे ७) रामा भिमा वाघे, वय ३३ वर्षे, रा. रामनगर झोपडप‌ट्टी, साई मंदीर जवळ, भिवंडी, जिल्हा ठाणे, ८) लोकेश उर्फ राका हेमराज बोरा, वय ४२ वर्षे, रा. रिंगण, ता. लाडनु, जिल्हा नागोर, राज्य राजस्थान, ह.मु. पावर हाउस ऑफीस मागे भिवंडी जिल्हा ठाणे, ९) दिपक राजेंद्र शहा, वय ३० वर्षे, रा. ऐकमा, पोस्ट रसुलपुर जिल्हा छपरा राज्य बिहार ह.मु. अंकित दुबे चौक, भिवंडी जिल्हा ठाणे यांचे मदतीने केल्याचे सांगीतल्याने त्यांचा सुध्दा शोध घेवुन त्यांना ताब्यात घेण्यात आले.

सदर गुन्हयातील एकुण ०९ (नडु) आरोपीतांना निष्पन्न करुन त्यांनी गुन्हयातील जबरीने चोरी केलेले सोन्याचे दागीने व नगदी रुपये तसेच गुन्हा करणे करीता वापरलेली एकुण तिन वाहने व सहा मोबाईल असा एकुण जु. किंमत २,४०,०००/-रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपीतांना पुढील कार्यवाही करीता पोलीस स्टेशन वर्धा (शहर) यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक डाँ सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, यांचे निर्देशा प्रमाणे पोउपनी उमाकांत राठोड, पोलीस अंमलदार हमीद शेख, चंद्रकांत बुरंगे, श्रीकांत खडसे, सचिन इंगोले, राजेश तिवस्कर, प्रमोद पिसे, महादेव सानप, पवन पन्नासे, रामकिसन ईप्पर, मनिष कांबळे, प्रदिप वाघ, अरविंद इंगोले, अनुप कावळे, अंकित जिभे, सर्व नेमणूक स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये