Sudarshan Nimkar
गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वयोवृध्द इसमाकडुन लबाडीने सोन्याचे अंगठी हस्तगत केलेल्या इराणी आरोपीस पोलिसांनी केली अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

     पो.स्टे. वर्धा शहर, जि. वर्धा येथे दाखल अप.क. 821/24 कलम 419, 420 भा. दं.वि. च्या गुन्हयात स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा च्या प्रॉपर्टी पथकाकडुन अज्ञात आरोपीचा शोध घेणे सुरु असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मुखबीरकडुन खात्रीशिर गोपनीय खबर मिळाली कि, सदर गुन्हा हा बिदर कर्नाटक येथे राहणारा गबरु उर्फ मिस्कीन वल्द मंसुर अली, वय 52 वर्ष व त्याचा मुलगा मुजाहिद मिस्कीन अली, रा. हुसैनी कॉलनी, छिद्री रोड, बिदर, कर्नाटक या दोघांनी मिळून केली आहे. इराणी वस्तीतुन आरोपी आणणे हे फार जिकरीचे, संयमाचे व शिताफिचे काम असल्याने स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा येथुन पथक रवाना होवुन राज्य कर्नाटक बिदर येथे पोहचुन बिदर येथे इराणी वस्तीचे कोणासही संशय येणार नाही असे सतत बाहेरुन अत्यंत कौशल्याने अवलोकन केले, याप्रमाणे सतत टेहाळणी करुन इराणी वस्तीत नवीन खबरी तयार करुन आरोपीच्या हालचाली बाबत माहिती घेवुन मोठ्या शिताफिने इराणी वस्तीतुन आरोपी गबरु उर्फ मिस्कीन वल्द मंसुर अली यास ताब्यात घेतले असता सदर इराणी आरोपीने सदरचा गुन्हयाची कबुली देवुन याच प्रमाणे यवतमाळ येथे सुध्दा एका वयोवृध्द इसमाकडुन दोन सोन्याच्या अंगठ्या लबाडीने काढुन घेतल्याची कबुली दिली. इराणी वस्तीचे लोक वस्तीतुन इतरत्र बाहेर जात नाही व बाहेरील व्यक्ती त्यांच्या वस्तीत गेल्यास लगेच अलर्ट होतात. त्यांच्याबाबत माहिती घेणे हे अत्यंत कौशल्याचे व संयमाचे काम असल्याने याकरीता स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा च्या अधिकारी व कर्मचारी यांनी स्थानिक पोलीसांच्या मदतीने आरोपीस ताब्यात घेतले.

सदर आरोपीस ताब्यात घेतांना महिलांनी आरोपी पोलीसांच्या हाती न लागला पाहिजे याकरीता रस्त्यावर खुप मोठी गर्दी करुन जोर-जोरात आरडा-ओरडा केला असता त्यांच्या कोणत्याही बाबीस न जुमानता आरोपीस शिताफिने ताब्यात घेवुन इराणी वस्तीच्या बाहेर घेवुन आले. सदर दोन्ही आरोपी हे वृध्द व्यक्तींना आपले सावज करुन पुढे वातावरण खराब आहे दंगा झाला, खुन झाला आहे चेकींग सुरु आहे अशी खोटी बतावणी करुन अंगावरील सोन्याच्या अंगठया, चैन व महिला असल्यास मंगळसुत्र हे एका कागदामध्ये काढुन ठेवण्यास सांगतात व कागदाची पुडी तयार करुन लबाडीने पुडी बदलवुन टाकतात. वयोवृद्ध्द इसम जेव्हा कागदाची पुडी उघडुन बघतो तेव्हा त्यात त्याच्या सोन्याच्या वस्तु ऐवजी दगड मिळुन येतो. तरी नागरीकांनी अश्या गुन्हेगारांच्या बतावणीला बळी पडु नये असे मा. पोलीस अधीक्षक, वर्धा कडुन अव्हान करण्यात येते.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक श्री. नूरूल हसन, अपर पोलीस अधिक्षक सागर कवडे, पो.नि. श्री. संजय गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली पो.उप नि. सलाम कुरेशी, अमोल लगड, पो.हवा. नरेंन्द्र पाराशर, नापोशी नितीन ईटकरे, पो.शी. संघसेन कांबळे, मीथुन जिचकार, चालक पो.हवा गजानन दरणे सायबर शाखेचे अनुप कावळे यांनी केली

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये