वर्धा जिल्हा कारागृह वर्ग १ मध्ये नेत्र रोग तपासणी व नेत्रदान संकल्प कार्यक्रम संपन्न
मा.जिल्हा शलयचिकित्सक डॉ.सचिन तडस व मा.जिल्हा नेत्र शल्य चिकीत्सक डॉ.मनोज साक्तेपार यांच्या मार्गद्शनाखाली
![](https://chandablast.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240615-WA0039-780x470.jpg)
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
जिल्हा सामाण्य रुग्णालय आणि समता फाऊडेशन मुंबई यांच्या संयुक्त विधमाने दिनांक १०जून ते १६ जून २०२४ या कालावधी अंतर्गत डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र स्मृती दृष्टी सप्ताह निमित्त वर्धा जिल्हा कारागहात ९६ बंदी रुग्णांची तपासणी करण्यात आली .२१ बंदी रुग्णांनी वा पोलीस कर्मचऱ्यांनी मरणोपरांत नेत्रदानाचे संकल्प पत्रक भरून दिले.या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून कराग्रह अधीक्षक एस एस पवार कारागृह जेलर नितीन एस क्षीरसागर वैधकिय अधिकारी डॉ रश्मी गोडे प्रामुख्याने उपस्थित होते.
नेत्र तपासणी चमू श्री.किशोर मेश्राम श्री रवींद्र वाघमारे तसेच नेत्रदान समुदेशन श्री प्रफुल्ल काकडे यांनी केले.या कार्यक्रमाचे संचालन श्री.आशिष गायक वाड समता फाऊडेशन मुं साबई यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल जाधव यांनी केले.या कार्यक्रमाच्या यश्वीतेसाठी पोलिस कर्मचारी श्री अमीत कथोरकर श्री अमीत कोडापे श्री शंकर वाघमारे श्री लोकेश ठाकरे श्रीमती श्वेता अमृतकर श्रीमती कविता निमकर यांच्या वतीने पार पडला.