डुकराच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू तर दूसरा गंभीर जखमी
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी
प्रा.शेखर प्यारमवार, सावली
सावली येथे खाजगी कामाकरिता आलेल्या इसमाचा गावाकडे परत जात असताना दुचाकीला डुकराने धडक दिल्याने गंभीर जखमी झाले. लोकांनी त्यांना उपचारासाठी तत्काळ दवाखान्यात भरती केले मात्र उपचारादरम्यान एकाचा मृत्यु झालं तर दुसरा गंभीर असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
सविस्तर वृत्त असे की, सावली तालुक्यातील उपरी येथील धनराज सातपुते व राजू कांबळे हे खाजगी कामाकरिता सावली येथे आले असता काम करून परत गावाकडे जात असतांना चकपिरंजी जवळील पुलाजवळ डुकराने दुचाकीला धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु दोन्ही जखमींची गंभीरता बघून त्यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले,परंतु गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान धनराज सातपुते यांचा मृत्यू झाले. तर राजू कांबळे याच्यावर उपचार सुरू आहे. मृतकाच्या मागे मोठा आप्त परिवार असल्याची माहिती मिळत आहे.