Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

डुकराच्या धडकेत एका दुचाकी स्वाराचा मृत्यू तर दूसरा गंभीर जखमी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

सावली येथे खाजगी कामाकरिता आलेल्या इसमाचा परत गावाकडे जात असतांना दुचाकीला डुकराने धडक दिल्याने जखमी झाले असता उपचारा दरम्यान एकाचा मृत्यु तर दुसऱ्यावर उपचार सुरु आहे

सविस्तर वृत्त असे की, सावली तालुक्यातील उपरी येथील धनराज सातपुते व राजू कांबळे हे खाजगी कामाकरिता सावली येथे आले असता काम करून परत गावाकडे जात असतांना चकपिरंजी जवळील पुलाजवळ डुकराने दुचाकीला धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता सावली येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले परंतु दोन्ही जखमींची गंभीरता बघून त्यांना गडचिरोली येथे रेफर करण्यात आले,परंतु गडचिरोली येथील जिल्हा रुग्णालयात उपचारा दरम्यान धनराज सातपुते यांचा मृत्यू झाले. तर राजू कांबळे याच्यावर उपचार सुरू आहे.

सदर मृतकाच्या मागे मोठा आप्त परिवार असल्याची माहिती मिळत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये