Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे संपादक अशोक जोशी यांच्या घराची भिंत पावसामुळे कोसळली

जोशी परिवार थोडक्यात बचावला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरातील श्री बालाजी मंदिर परिसरात साप्ताहिक समाज संवाद चे संपादक अशोक जोशी व त्यांचे लहान बंधू वृत्तपत्र विक्रेते रवींद्र जोशी यांच्या घराची भिंत दिनांक ११ जुन ला दुपारी४ वाजेच्या सुमारास कोसळली .शेजारी यांनी आरडा ओरड केल्यामुळे जोशी परिवार बाहेर निघाले आणि थोडक्यात सर्वजण बचावले.

   साप्ताहिक समाज संवादच संपादक अशोक जोशी सह संपादिका अनिता जोशी व त्यांचे लहान बंधू वृत्तपत्र विक्रेते रवींद्र जोशी हे आपल्या पुरातन घरामध्ये राहतात . दिनांक 10 जून रोजी रात्री जोरदार पाऊस झाला सोबतच सोसाट्याचा वारा सुरू होता. जोशी यांच्या घराच्या शेजारी बांधकाम सुरू असल्यामुळे शेजारील घर हे पाडण्यात आलेले होते.

पावसाच्या सरी या जोशी यांच्या भिंतीवर कोसळल्यामुळे विटा मातीची भिंत ओली झाली. दि ११ जुनला दुपारी वारा सुरू झाल्यामुळे सदर भिंतही दुपारी चार वाजेच्या सुमारास कोसळत असल्याचे चित्र घरासमोर असलेले गणेशभाऊ यांना दिसून आले . त्यांनी व शेजारच्या लोकांनी आरडा ओरड केल्यामुळे संपूर्ण जोशी परिवार हे बाहेर आले आणि बघता बघता भिंत कोसळली. यासोबतच भिंतीवरचा पहिला मजला हा सुद्धा जमीन दोस्त झाला. जोशी परिवार थोडक्यात बचावले सदर घटनेची माहिती ही महसूल विभागाचे शहर तलाठी लागवाले यांना व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरुण मोकळे यांना देण्यात आली. घटनास्थळ येथे येऊन महसूल विभागाने व नगरपरिषदेने पंचनामा केला . सदर इमारत ही जवळपास 100 वर्ष जुनी असून १ मजली होती. त्या भिंतीचे रुंदी जवळपास तीन फूट रुंद अशी होती भिंत कोसळल असताना घरांमधील सदस्य घरीच होते मात्र कोणालाही दुखापत किंवा जीवित हानी झाली नाही मात्र आर्थिक नुकसान झाले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये