Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा व पालकांचा गुणगौरव सत्कार संपन्न 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

स्थानिक देऊळगावराजा येथील राजलक्ष्मी इंटरनॅशनल (सीबीएसई)स्कूल मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा गुणगौरव सत्कार करण्यात आला.राष्ट्रमाता जिजाऊ बहुउद्देशिय सेवाभावी संस्था असोला जहाॅगिर द्वारा संचालीत राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष्या डॉ.सौ. मीनलताई शेळके व सचिव डॉ. रामप्रसादजी शेळके यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे सचिव डॉ.रामप्रसाद शेळके यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी बोलत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना ज्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये करिअर करायचे आहे ते क्षेत्र निवडण्याची संधी पालकांनी विद्यार्थ्यांना द्यावी त्यावर सक्तीने आपला निर्णय लादू नये व पाल्यांना जागृतपणे योग्य ते मार्गदर्शन करावे. यावेळी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.त्यामध्ये विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे तृप्ती शिंगणे 95%, अनुष्का वाघमारे 94.40%, शलाका खरात 94.20%, मंदार पेटकर 86%,वेदश्री शेळके 85.45%. यावेळी उपस्थित पालकांनी व विद्यार्थ्यांनी शाळेविषयी असलेले आपले अनुभव रुपी मनोगत व्यक्त केले यामध्ये विशेष म्हणजे कोणतेही शिकवणी वर्ग न लावता शाळेच्या विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम करून विशेष प्राविण्यसह गुण संपादन केले.

यावेळी स्कूल चे सी ई ओ सुजित गुप्ता अकॅडमिक हेड डॉ.प्रियंका देशमुख उपप्राचार्य फैजल सर व सिंग सर यांनी कार्यभार पाहिला. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीना निर्मल मॅडम यांनी केले व आभार प्रदर्शन सुनीता टेकाळे मॅडम यांनी केले याप्रसंगी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये