Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

या पावसाळ्यात 50 हजार झाडे लावण्याचा पुरोगामी शिक्षक संघटनेचा निर्धार

कणकवली येथे झालेल्या राज्य कार्यकारी मंडळ सभेत ठराव

चांदा ब्लास्ट

       पर्यावरण संरक्षणासाठी या पावसाळ्यात महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्यात ५० हजार झाडे लावून त्यांचे संवर्धन करण्याचा निर्धार केला. कणकवली संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सभेत तसा संमत करण्यात आला.

    महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेची राज्य कार्यकारिणी सभा कणकवली जि‌.सिंधुदुर्ग येथे राज्य नेते विजय भोगेकर यांचे उपस्थितीत नुकतीच संपन्न झाली.

     बैठकीच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील होते.

     बैठकीत निसर्गातील वाढते तापमान व वाढलेली वृक्षतोड यामुळे निसर्गाचे संरक्षण करणे ही काळाची गरज असल्याचे मत बैठकीत उपस्थित असलेल्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

    बैठकीत शिक्षकांची रिक्त पदे १००% भरावीत, संच मान्यतेचे अन्यायकारक निकष रद्द करावेत,

बालाकाच्या मोफत शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी चे वर्ग विनाअट जिल्हा परिषद शाळेस जोडावेत, इयत्ता ६ वी ते ७ वी अथवा इयत्ता ६ वी ते ८ वी च्या वर्गांना विनाअट ३ शिक्षक मंजूर करावेत, आंतरजिल्हा ७ वा टप्पा लवकरात लवकर सुरू करावा, आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तत्काळ मुक्त करावे, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना शिपाई पद मंजूर करावे, सर्व केंद्र शाळांना क्लार्कचे मंजूर करावे, शालेय पोषण आहार स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावा, जून व डिसेंबर मध्ये वर्षातून २ वेळा पदोन्नती घेण्याचे निर्देश सर्व जिल्हा परिषदांना व्हावेत, नवीन भरतीतील उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती देण्याचे निर्देश. व्हावेत आदी मागण्यांचे ठराव संमत करण्यात आले.

      बैठकीस राज्य नेते विजय भोगेकर, राज्यसरचिटणीस हरिश ससनकर, राज्य कार्याध्यक्ष प्रकाश पाध्ये, राज्य कोषाध्यक्ष जी एस मंगनाळे, महिला राज्य सरचिटणीस शारदा वाडकर , प्रकाश पाटील राज्य संघटक, राज्य कार्यकारी सचिव रंगराव वाडकर ,प्रेमिला माने राज्य महिला उपाध्यक्ष, यावेळी सुरेश साळवी जेष्ठ सल्लागार रत्नागिरी, गोविंद पाटील रायगड जिल्हा नेते , सचिन जाधव सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष,एस के पाटील जिल्हाध्यक्ष कोल्हापूर, किशोर आनंदवार जिल्हाध्यक्ष चंद्रपूर, इरफान मिर्झा

 जिल्हाध्यक्ष वाशिम , महेंद्र हिवे जिल्हाध्यक्ष अमरावती , रत्नागिरी जिल्हाध्यक्ष यशवंत पेंढारकर संघर्ष सावरकर जिल्हाध्यक्ष, सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रकाश वाडकर, प्रदिप पवार जिल्हा सरचिटणीस रत्नागिरी,कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस तुषार पाटील,जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोढे,जिल्हा उपाध्यक्ष संभाजी पाटील,अमरावती जिल्हा उपाध्यक्ष नितीन पेढेकर,जीवन भोयर, गजानन चिंचोळकर सुभाष अडवे,जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर,जिल्हा उपाध्यक्ष किरण राठोड,जिल्हा संघटक बालाजी हाळदे, जिल्हा संघटक देवराव अमोदे गोकुळ चारथळ अचलपूर तालुकाध्यक्ष, लक्ष्मण खोब्रागडे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख चंद्रपूर, किशोर यनगंटीवार चंद्रपूर तालुका उपाध्यक्ष, लक्ष्मण सुरपाम चंद्रपुर तालुका संघटक जगदीश ठाकरे चेअरमन शिक्षक सहकारी पतसंस्था भद्रावती, बाबा रणसिंग तालुकाध्यक्ष पन्हाळा, नाथ मोरे तालुकाध्यक्ष पन्हाळा,मनोज पवार तालुका उपाध्यक्ष पन्हाळा यांच्या सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

    सभेच्या सुरूवातीला सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सचिन जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले तर आभार संधुदुर्ग जिल्हा नेते अशोक जाधव यांनी माणरे, सभेचे सुत्र संचलन प्रकाश वाडकर जिल्हा सरचिटणीस सिंधुदुर्ग तथा हरीश ससनकर राज्य सरचिटणीस यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये