ताज्या घडामोडी

पिस्तुलासह फिरणाऱ्या आरोपीस पोलिसांनी ठोकल्या बेड्या

चांदा ब्लास्ट
बल्लारपूर :- जिल्ह्यातील संवेदनशील म्हणून प्रसिध्द असलेल्या बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक युवक कंबरेला पिस्तुल अडकवून फिरत असुन त्याच्यामुळे शहरात दहशत निर्माण होऊ शकते तसेच एखादे मोठे गुन्हेगारी कृत्य घडण्याची शक्यता असल्याच्या गुप्त माहितीवरून बल्लारपूरचे ठाणेदार आसिफ रजा ह्यांनी आपल्या चमुसह सापळा रचून एका युवकाला शिताफीने अटक केली आहे.

प्राप्त माहितीनुसार ठाणेदार आसिफ रजा ह्यांना खबऱ्याने गोपनीय माहिती दिली की, शहरात एक युवक कंबरेला पिस्तुल अडकवून फिरत आहे. प्राप्त माहितीवरून आसिफ रजा ह्यांनी तत्काळ पोलीस पथक तयार करून संबंधित युवकाचा शोध घेणे सुरू केले. सदर युवक एफ डी सी एम परिसरातील एका पडीत सदनिकेत असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच त्यांच्या चमूने सापळा रचून सुरेश वर्मा (21) रा, संतोषी माता वॉर्ड, बल्लारपूर ह्याला अटक केली असुन त्याच्याविरुद्ध बल्लारपूर पोलीस ठाण्यात अपराध क्र 626/2024 कलम 3, 25, आर्म ऍक्ट अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक रीना जनबंधू, दीपक साखरे उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक असिफराजा बी शेख, पो उप निरीक्षक प्रेम शहा सयाम, पो उप निरीक्षक विक्की लोखंडे, स, फो गजानन डोईफोडे, पो ह रणवीजय ठाकूर, पुरुषोत्तम चिकाटे, सुनील कामटकर, संतोष दंडेवार, सत्यवान कोटनाके, विशिष्ट रंगारी, शरदचंद्र कारुष, मिलिंद आत्राम, शेखर माथणकर, श्रीनिवास वाभिटकर इ, पोलीस कर्मचारी यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये