Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

इको- प्रो ची भद्रावती शहरातील ऐतिहासिक स्थळांना भेट

ऐतिहासिक स्थळांची माहिती घेतली जाणून

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          चंद्रपूर येथील इको- प्रो या संघटनेचे ट्रान्सफॉर्म 2024 हे शिबिर सुरू आहे.या उपक्रमांतर्गत शिबिरातील प्रशिक्षणार्थी जिल्ह्यातील ऐतिहासिक स्थळांना भेटी देत आहेत. या अंतर्गत इको-प्रो चे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे यांच्या नेतृत्वात प्रशिक्षणार्थ्यांनी दिनांक 28 ला शहरातील विविध ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन अभ्यास दौरा केला व या ऐतिहासिक स्थळांची पाहणी केली. या दरम्यान बंडू धोत्रे यांनी येथील ऐतिहासिक स्थळांची माहिती प्रशिक्षणार्थ्यांना देऊन या ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन व जतन करण्याचे आवाहन केले.

या अभ्यास दौऱ्या दरम्यान शहरातील गवराळा गणेश मंदिर, ऐतिहासिक किल्ला,विजासन येथील ऐतिहासिक बुद्ध लेणी,भद्रनाग मंदिर, चंडिका मंदिर,भवानी मंदिर,बालाजी मंदिर व इतर ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यात आल्या. याशिवाय शहरातील सुप्रसिद्ध ग्रामोदय संघाला भेट देऊन तेथील हस्तकलेची पाहणी केली. या उपक्रमात वर्ग 5 ते 11 मधील जवळपास 15 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. मुलांना बालपणापासूनच ऐतिहासिक स्थळांविषयी जाणीव निर्माण व्हावी व त्यांना या ऐतिहासिक स्थळांचे महत्त्व समजावे यासाठी हा उपक्रम इको-प्रोतर्फे हाती घेण्यात आल्याचे यावेळी इको- प्रो संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी सांगितले.

आपला वारसा आपणच जपूया या अभियानांतर्गत हा उपक्रम इको -प्रो संघटने द्वारे हाती घेण्यात आला आहे. यावेळी इको-प्रो संघटनेचे अध्यक्ष बंडू धोत्रे, योजना ताई धोत्रे, संदीप जीवने, अमोल दौलतकर, संतोष रामटेके, शंकर धोटेकर आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये