ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खेडी येथे उष्माघाताने मजुराचा मृत्यू 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

सावली – चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला आहे. तप्त उन्हामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहे. उन्हाचा तडाखा आता जिवघेणा ठरू लागला आहे. सायंकाळच्या सुमारास खेडी बस स्थानका जवळील धाब्यावर मुक्कामी असलेल्या रमेश साहू रा. चंद्रपूर या मजुराचा मृतदेह आढळून आला. त्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

     खेडी बस स्थानकाजवळील बंद असलेल्या धाब्यावर नदीवर पाण्याच्या टाकीचे काम करणारे 3 मंजूर मुक्कामी थांबले होते. त्यातील मृतक मजूर तब्येत ठीक नसल्याचे सांगून मुक्कामी ठिकाणी थांबला होता तर सोबतचे 2 मजूर कामावर गेले होते. उन्हाचा पारा चांगलाच वाढला होता. सायंकाळी मजूर आले असता सोबतचा मजूर मृत आढळून आला.

याबातची माहिती सावली पोलिसांना दिली असता पंचनामा करून शवविच्छेदानासाठी पाठविण्यात आले. हा मजूर दोन दिवसापासून दारू पिऊन असल्याने उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. .

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये